ETV Bharat / bharat

सेप्टिक टँकमध्ये पडून चौघांचा मृत्यू; छत्तीसगडमधील घटना.. - सेप्टिक टँकमध्ये पडून चौघे ठार

केवळ कुतूहल म्हणून एक व्यक्ती त्या टँकजवळ गेला आणि गॅसमुळे बेशुद्ध होऊन टँकमध्येच पडला. त्याला शोधायला गेलेली दुसरी व्यक्तीही त्याचप्रकारे टँकमध्ये कोसळली. या दुसऱ्या व्यक्तीला टँकमध्ये पडताना पाहून तिसरी व्यक्तीही टँकमध्ये वाकून पहायला गेली, आणि गॅसमुळे बेशुद्ध होऊन आत पडली...

accident in mungeli 4 died
सेप्टिक टँकमध्ये पडून चौघांचा मृत्यू'; छत्तीसगडमधील घटना..
author img

By

Published : Jun 23, 2020, 10:00 PM IST

रायपूर : छत्तीसगडच्या मुंगेरी जिल्ह्यामध्ये सेप्टिक टँकमध्ये पडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्याच्या मर्राकोना गावामध्ये ही घटना घडली, यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील कौशिक कुटुंबीयांमध्ये लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गावात मोठ्या प्रमाणात लोक आले होते. या पार्श्वभूमीवर, जवळच असलेल्या सेप्टिक टँकची स्वच्छता करण्याचे आदेश ग्रामपंचायतीने दिले होते. मंगळवारी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सेप्टिक टँक दुरूस्त केल्यानंतर लोकांना इशारा दिला होता, की टँकमधून काही काळासाठी गॅस बाहेर येत राहील, त्यामुळे या टँकजवळ कोणीही जाऊ नये.

केवळ कुतूहल म्हणून एक व्यक्ती त्या टँकजवळ गेला आणि गॅसमुळे बेशुद्ध होऊन टँकमध्येच पडला. त्याला शोधायला गेलेली दुसरी व्यक्तीही त्याचप्रकारे टँकमध्ये कोसळली. या दुसऱ्या व्यक्तीला टँकमध्ये पडताना पाहून तिसरी व्यक्तीही टँकमध्ये वाकून पहायला गेली, आणि गॅसमुळे बेशुद्ध होऊन आत पडली. हे पाहताच आजूबाजूच्या लोकांना तात्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाचारण केले. तर, त्यांना बाहेर काढण्यासाठी टँकमध्ये उतरलेला सफाई कर्मचारीही आतमध्ये गुदमरुन मृत्यूमुखी पडला, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : पतंजलीचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवऱ्यात; 'आयुष' मंत्रालयाने मागितले दाव्यांचे पुरावे..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.