ETV Bharat / bharat

सुरक्षा दलास यश...! पश्चिम चंपारणमध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा - नक्षलवादी ठार

पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मिकीनगरमध्ये एसटीएफ आणि एसएसबीच्या संयुक्त पथकाने 4 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. तीन एसएलआरसह चार शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. ही चकमक लौकरिया पोलीस स्टेशन परिसरातील चरपनियाजवळ घडली.

नक्षलवादी ठार
नक्षलवादी ठार
author img

By

Published : Jul 10, 2020, 12:26 PM IST

नवी दिल्ली - बिहारच्या उत्तरेला असलेल्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मिकीनगरमध्ये एसटीएफ आणि एसएसबीच्या संयुक्त पथकाने 4 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. एसटीएफचे दोन जवानही जखमी झाले असून त्यांना उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बीटीआर) च्या जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. माहितीनुसार एसटीएफने एसएसबीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी एसटीएफ व एसएसबीवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आतापर्यंत चार नक्षलवादी ठार झाले आहेत.

तीन एसएलआरसह चार शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. चकमकी लौकरिया पोलीस स्टेशन परिसरातील चरपनियाजवळ घडली. ज्यात चार नक्षलवादी ठार झाले. एसटीएफ आणि एसएसबी व स्थानिक पोलिसांनी पळ काढलेल्या नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे वनपरिक्षेत्रात शोध मोहीम राबवण्यात अडचण येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.