ETV Bharat / bharat

पत्रकाराचा मुलगा अपहरण आणि हत्या प्रकरण : चौघांना अटक

महबूबाबादचे पोलीस अधीक्षक कोटा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे अपहरण झालेल्या मुलाच्या ओळखीतील होते. त्यामुळे आपले बिंग फुटण्याच्या भीतीने त्यांनी मुलाची हत्या केली. तसेच, आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केल्याची गोष्टही केवळ अफवा असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले...

4 arrested in Telangana for kidnapping, murder of journalist's son
तेलंगणा अपहरण आणि हत्या प्रकरण : चौघांना अटक
author img

By

Published : Oct 23, 2020, 7:53 AM IST

Updated : Oct 23, 2020, 10:34 AM IST

हैदराबाद : काही दिवसांपूर्वी तेलंगणामधील एका नऊ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते. मुलाच्या कुटुंबीयांनी खंडणीची व्यवस्था करेपर्यंत अपहरणकर्त्यांनी या मुलाची हत्याही केली होती. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी चार आरोपींनी अटक केली आहे.

रणजीत रेड्डी हे एका तेलुगु वृत्तवाहिनीसाठी पत्रकारिता करत. त्यांचा मुलगा दिक्षित रेड्डी याचे १८ ऑक्टोबरला अपहरण करण्यात आले होते. यानंतर अपहरणकर्त्यांनी ४५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, काल (गुरुवार) महबूबाबाद पासून काही किलोमीटर अंतरावर पोलिसांना या मुलाचा मृतदेह आढळून आला. अपहरण केल्यानंतर एका तासाच्या आतच या मुलाची हत्या झाली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महबूबाबादचे पोलीस अधीक्षक कोटा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रणजीत रेड्डी यांच्या कुटुंबीयांच्या ओळखीतील होते. त्यामुळे आपले बिंग फुटण्याच्या भीतीने त्यांनी मुलाची हत्या केली. तसेच, आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केल्याची गोष्टही केवळ अफवा असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : यावर्षी पाकिस्तानकडून तब्बल ३ हजार ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

Last Updated : Oct 23, 2020, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.