ETV Bharat / bharat

मेक्सिकोमधून अवैधरीत्या अमेरिकेत घुसण्याच्या प्रयत्नातील ३११ भारतीयांची स्वगृही रवानगी - इमिग्रेशन विभाग भारत

मेक्सिकोमार्गे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३११ नागरिकांना मेक्सिको पुन्हा भारताच्या हवाली करणार आहे. या सर्वांना भारतात आणण्यासाठी विशेष विमानाची सोय मेक्सिको देशाने केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Oct 17, 2019, 2:51 PM IST

नवी दिल्ली - मेक्सिकोमार्गे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३११ नागरिकांना मेक्सिको पुन्हा भारताच्या हवाली करणार आहे. मागील काही महिन्यांपूर्वी एजंटच्या मदतीने या नागरिकांनी बेकायदेशीरपणे मेक्सिकोमध्ये प्रवेश केला होता. तेथून ते अमेरिकेत जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पकडण्यात आले होते.

अमेरिकेत प्रवेश मिळवून आश्वासन एजंटने या लोकांना दिले होते. त्यासाठी प्रत्येकी २५ ते ३० लाख घेण्यात आले होते. यातील बहुतांश नागरिक पंजाब राज्यातील आहेत. दोन खासगी विमानाद्वारे सर्वजण मेक्सिकोमध्ये गेले होते, असे भारतीय इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. या सर्वांना भारतात आणण्यासाठी विशेष विमानाची सोय मेक्सिको देशाने केली आहे. ६० सुरक्षा रक्षक नागरिकांना घेऊन भारतात येणार आहेत . मेक्सिकोमधील तोलुका विमानतळावरून निघालेले विशेष विमान शुक्रवारी सकाळी दिल्लीत पोहचणार आहे.

नागरिकांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास तीन ते चार तासांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. याप्रकरणी कायदेशीर खटला दाखल करण्यात येऊ शकतो. तसेच अवैध प्रवेश मिळून देण्यामागे असणाऱ्या एजंटसंबधी तपास केला जाऊ शकतो, असे इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.