पुलवामा - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज बुधवारी सकाळच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले.
पुलवामा जिल्ह्यातील कंगण परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर त्याठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांना गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलाचे जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले.