ETV Bharat / bharat

सुरक्षेतील हलगर्जीपणा भोवला..! ३ पायलटसह कॅबिन क्रू सदस्य निलंबित, डीजीसीएची कारवाई

दोन्ही पायलटमध्ये झालेल्या वादामुळे विमान धावपट्टीवर चुकीच्या ठिकाणी उतरले होते. लँडिग करताना रनवेवरील लाईट्सना नुकसान पोहोचले होते.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 16, 2019, 11:19 PM IST

नवी दिल्ली - कोलकाता येथे स्पाईसजेट विमानाचे लँडिग करताना सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे रनवेवरील लाईटचे नुकसान झाले होते. यावेळी पायलट आणि कॅबिन क्रूच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. नशीब बलवत्तर म्हणून विमानाचा अपघात होता होता टळला. यासर्व प्रकारानंतर नागरी उड्डयन महासंचलयानाने (डीजीसीए) कारवाई करताना पायलटसह कॅबिन क्रूच्या सदस्यांना ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

स्पाईसजेटचे २ पायलट सौरभ गुलिया आणि आरती गुणसेकरन यांनी २ जुलैला कोलकाता येथे बोईंग-७३७ विमानाचे लँडिग करताना रनवेवरील लाईट्सना नुकसान पोहोचवले होते. यावेळी दोन्ही पायलटमध्ये झालेल्या वादामुळे विमान धावपट्टीवर चुकीच्या ठिकाणी उतरले होते. तर, एअर इंडियाचे ए-३१९ विमान १७ जूनला बंगळुरुवरुन कोलकात्याला जाण्यासाठी तयारी करत होते. यावेळी विमानात पायलट मिलिंद आणि कॅबिन क्रू सदस्य रजत वर्मन यांच्यात हाणामारी झाली. याप्रकरणी डीजीसीएने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. नोटीसीचे उत्तर समाधानकारक न मिळाल्यामुळे चौघांना ६ महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Intro:Body:

national 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.