हैदराबाद - दिल्लीच्या निजामुद्दीन येथे 'मरकझ तबलिगी जमात' या एका धार्मिक कार्यक्रमात तेलंगाणामधील नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 3 जणांचा कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृताचा आकडा 9 वर पोहचला आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. याच मरकझमध्ये तेलंगणा राज्यातील सहभागी झालेल्या काही मुस्लीम बांधवांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आता सध्या या कार्यक्रामातील सहभागी लोकांचा शोध घेतला जात आहे.
तेलंगाणामध्ये कोरोनाबाधीत रुग्णाचा आकडा हा 96 वर आला आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच अनेकांना निरक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. देशभरामध्ये तब्बल 1 हजार 834 जण कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.