नवी दिल्ली - भारतात कोरोनाचे 8 हजार 356 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 20 टक्के रुग्णच अतिदक्षता विभागात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. एकूण रुग्णांपैकी 20 टक्के म्हणजे 1 हजार 256 रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून त्यांची अतिदक्षता विभागात काळजी घेण्यात येत आहे. ही आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण यातून सरकारची तयारी दिसून येते, असे सचिव लव अगरवाल म्हणाले.
-
As per 9th April data, if we needed 1,100 beds we had 85,000 beds. Today when we need 1,671 beds, then we have 1 lakh 5 thousand beds in the dedicated 601 #COVID hospitals: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/sB7wqfHea1 pic.twitter.com/OplUFXTVjL
— ANI (@ANI) April 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">As per 9th April data, if we needed 1,100 beds we had 85,000 beds. Today when we need 1,671 beds, then we have 1 lakh 5 thousand beds in the dedicated 601 #COVID hospitals: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/sB7wqfHea1 pic.twitter.com/OplUFXTVjL
— ANI (@ANI) April 12, 2020As per 9th April data, if we needed 1,100 beds we had 85,000 beds. Today when we need 1,671 beds, then we have 1 lakh 5 thousand beds in the dedicated 601 #COVID hospitals: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/sB7wqfHea1 pic.twitter.com/OplUFXTVjL
— ANI (@ANI) April 12, 2020
देशात 29 मार्चला फक्त 979 रुग्ण होते मात्र, आता 8 हजार 356 रुग्ण संख्या झाली आहे. 9 तारखेच्या आकडेवारीनुसार जर आपल्याला 1 हजार 100 खाटांची गरज असेल तर आपल्याकडे 85 हजार खाटांची उपलब्धता आहे. आज जर आपल्याला 1 हजार 671 खाटांची गरज असेल तर आपल्याकडे 1 लाख 5 हजार खाटा कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या 601 रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती अगरवाल यांनी दिली.