राजपूर - दुचाकीने जात असलेल्या छत्तीसगडच्या २ पोलिसांवर नक्षलवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेत दोन्ही पोलिसांचा मृत्यू झाला आहे. अरविंद मिंज आणि सुक्कू हपका, असे वीरमरण आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ही घटना छत्तीसगडच्या बीजापूर येथील असून परिसरात खळबळ उडाली आहे.
संबंधित पोलीस दुचाकीने कामानिमित्त जात होते. त्यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक दोघांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रतिहल्ला करण्याचा त्यांना वेळच मिळाला नाही, असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे.
लोकसभा निडवणुकींच्या पार्श्वभूमिवर नक्षलवाद्यांच्या कारवायां वाढल्या आहेत. विविध उपाय योजना करूनही सरकार त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.