ETV Bharat / bharat

तेलंगणातून आत्तापर्यंत 2 लाख परप्रांतीय पोहोचले घरी, तर बिहारमधून 300 कामगार परत - तेलंगणातून परप्रांतीयांचे स्थलांतर

सध्या जगभरासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशात चौथा लॉकडाऊन सुरु आहे. अनेक राज्यात परप्रांतीय कामगार, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना सध्या त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडवण्यात येत आहे. तेलंगणा राज्यातून आत्तापर्यंत 2 लाखांच्या आसपास परप्रांतीय लोकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्यात आले आहे.

2 lakh migrant workers have reached at home from Telangana
तेलंगणातून आत्तापर्यंत 2 लाख परप्रांतीय पोहोचले घरी
author img

By

Published : May 24, 2020, 7:58 PM IST

हैदराबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सरु असून, यामध्ये काही नियम हे शिथील करण्यात आले आहेत. अनेक राज्यात परराज्यातील कामगार, विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न सरु केले आहेत. श्रमीक रेल्वेद्वारे सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेलंगणामधून आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, ओरीसा, झारखंड, मध्य प्रदेश, आसाम, मनीपूर येथे 150 रेल्वेने कामगार आणि विद्यार्थ्यांना सोडण्यात आले आहे. जवळपास आत्तापर्यंत रेल्वे आणि बसने 2 लाख कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले आहे.

2 lakh migrant workers have reached at home from Telangana
तेलंगणातून आत्तापर्यंत 2 लाख परप्रांतीय पोहोचले घरी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी परराज्यातील कामगार हे तेलंगणाच्या विकासाचे प्रतिनिधी आहेत असे म्हटले होते. तसेच त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, त्यांना सुखरुप घरी पोहोचवले जाईल असेही ते म्हटले होते. त्याप्रमाणे परराज्यातील कामगांरना सोडवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या कामगारांना घरी सोडण्याच्या कामामध्ये रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत, जिल्हाधिकारी मेदचल व्यंकटेश्वरलू, डीसीपी मलकाजीगिरी रक्षिता आईपीएस जेसी प्रसाद यांचे मोठे योगदान आहे. या अधिकाऱ्यांसह त्यांच्या टीमने सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

बिहारमधून 300 लोक तेलंगणात

3 मे ला तेलंगणातून कामगारांना घेऊन बिहारमध्ये एक रेल्वे गेली होती. त्या रेल्वेमध्ये बिहारमधील खगारीया जिल्ह्यातून 300 कामगार हे परत तेलंगणामध्ये आले आहेत. हे सर्व कामगार राईस मीलमध्ये काम करणारे असल्याची माहितीही महेश भागवत यांनी दिली.

चिमुकलीला मदत करताना पोलीस आयुक्त महेश भागवत

155 अन्न छत्रालय

तेलंगणा राज्यात जवळपास 155 अन्न छत्रालय खुली करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून गरजूंना दुपारचे आणि सध्याकाळचे जेवण दिले जात आहे. तसेच परप्रांतीय कामगारांना दोन्ही लॉकडाऊनमध्ये 500 रुपये आणि 12 किलो अन्नधान्य राज्य सरकारकडून दिले असल्याची माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली.

अधिकारी चर्चा करताना

सामाजिक संघटनांचा पुढाकार

गरजू लोकांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामाजित संघटना पुढे आल्याचेही महेश भागवत म्हणाले. रामकृष्ण मठ, रोटरी क्लब, रॉबीन हूड आर्मी, आगाखान अॅखॅडमी, मेगा इंजिनीयर यांचेही खूप मोठे सहकार्य लाभले. जेवनासह आर्थिक मदतीचा हात या संस्थांनी पाठवला आहे.

गरजूंना मदत करताना पोलीस आयुक्त महेश भागवत

कामगारांसह विद्यार्थ्यांनी तेलंगणा सरकारचे आभार मानले. तसेच त्यांनी गावी सोडण्याच्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचेही आभार मानले. तसेच कोरोनाचे संकट गेल्यानंतर परत माघारी येण्याची इच्छाही काही कामगारांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.