नवी दिल्ली - मोहनदास करमचंद गांधी यांनी शालेय जीवनातच स्वतःला सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून स्वीकारलं होतं. त्यांना एखादी गोष्ट दुसऱ्याला धड पटवूनही देता येत नव्हती. मात्र, त्यानंतर गांधींनी आमुलाग्र बदल घडवत स्वतःला सिद्ध केले. बौद्धिकदृष्या त्यांचा खूप विकास झाला. नक्कीच यासाठी त्यांना अफाट परिश्रम घेतले असतील. त्यामुळचं तर हे शक्य झालं. त्यांनी बौद्धिक आणि मानसिक दृष्या स्वत:ला इतकं कणखर बनवलं की ते कोणत्याही अडचणीला भिडू शकतात.
२१ वर्षाचे असताना जेव्हा ते लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घ्यायला गेले. तेव्हा त्यांनी 'द व्हेजिटेरियन' या इंग्रजी साप्ताहिकासाठी ९ लेख लिहले होते. यामध्ये त्यांनी शाकाहार, भारतीय खानपान, रितीरिवाज आणि धार्मिक उत्सवांवर चर्चा केली होती. गांधीनी सुरुवातीच्या काळात केलेल्या लेखनामधून ते किती सोप्या भाषेत विषय मांडायचे हे दिसून येतं. त्यांनी फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लिखाण केले नाही. अतिरंजकपणेही कधी लिहलं नाही. सत्याप्रती त्यांची कायमच निष्ठा राहिली. दुसऱ्यांना उपदेश देणे हा त्यांच्या लिखानाचा उद्देश असे.
माध्यमांचे स्वातंत्र्य
वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी एका न्यायालयात त्यांचा अपमान झाला. त्याबद्दल त्यांनी तेथील एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये लिहलं होतं. एका रात्रीतच त्यांचा हा लेख लोकप्रिय झाला होता. यावरून लक्षात येत की, त्या काळातही माध्यमांना स्वांतत्र्य होते. काळा गोरा असा वर्णभेद केला जात असे, मात्र, माध्यमांना स्वातंत्र्य होते.
१८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत गांधींनी जेव्हा राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा वृत्तपत्रांमध्ये संपादकीय पत्र या सदरामध्ये ते लिहायचे. तेथूनच त्यांनी भारतीय वृत्तपत्रांसाठीही अनेक पत्र लिहली. यामधूनच ते जीवी नटेसन सारख्या दिग्गज संपादकाच्या संपर्कामध्ये आले. जीनी नटेसन हे 'इंडियन रिव्ह्यूचे संपादक होते. त्या दोघांमध्ये कायमच मैत्रीपुर्ण संबध राहिले.
जनमानसाचा आवाज बुलंद करावा लागेल
१८९३ मध्ये आफ्रिकेत गेल्यानंतर भारतीय लोकांच्या अधिकारांसाठी लढावे लागेल हे थोड्याच दिवसानंतर गांधीच्या लक्षात आले. अडचणीच्या काळात धैर्य ठेवावे लागेल. सत्याच्या मार्गावर ठाम रहावे लागेल. हे सर्व त्यांनी सरकारला लिहलेले पत्र आणि त्यांच्या इतर पत्रांवरुन दिसून येते. आफ्रिकेतील कायदे तेथील बहुतांश जनतेच्या विरोधात असतानाही त्यांनी तरुण वयातच हे काम केले. २५ ऑक्टोबर १८९४ मध्ये टाईम्स ऑफ नटालला लिहलेल्या पत्रामध्ये त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला होता.
महात्मा गांधीना लिहलेले पत्र...
तुम्ही भारतीय किंवा आफ्रिकेतील मूळ निवासी नागरिकांना कधीही मतदानाचा अधिकार देणार नाहीत, कारण ते रंगाने काळे आहेत. तुम्ही फक्त त्यांचा बाह्य रंग पाहताय. गोरी कातडी असलेल्या व्यक्तीच्या मनात विष आहे की अमृत याच्याशी तुम्हाला काहीही देणेघेणे नाही. तुमच्यासाठी गोरी कातडीच सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही बनवलेले नवे नियम पुन्हा वाचताल काय?
वसाहतीमध्ये राहणाऱया कृष्णवर्णिय लोकांबद्दल तुमची कृती तपासून पाहणार आहात काय? तुमच्या कृतीला तुम्ही बायबल किंवा ब्रिटीश परंपरांशी ताडून पाहा? तुम्हाला हे योग्य वाटतेय काय? जर तुम्ही ब्रिटीश परंपरा आणि ख्रिश्चन धर्म दोन्हीन्ही मानत नसाल, तर मला काही म्हणायचे नाही. मी जे लिहलंय ते मी माघारी घेईल. तरीही तुमचे खूप सारे अनुयायी असतील तर हा भारतीय आणि ब्रिटीश दोघांसाठीही दुखद दिवस आहे, असे गांधीनी पत्रात लिहले होते.
जर तुम्ही व्यापक दृष्टीकोनातून पाहिले तर गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गामुळे नेल्सन मंडेला सारख्या लोकांना प्रेरणा मिळाली. वर्णभेद प्रथेवर नेल्सन मंडेलांचा प्रहार हे गांधीवादी विचारसरणीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आफ्रिकेमध्ये गांधींजींची पूजा होत नाही, मात्र, त्यांनी गांधीजींचे विचार आत्मसात केले आहेत.
आता आपण अशा काळामधून जात आहोत जेथे आपल्याला सर्वात जास्त गांधीजींच्या विचारांची गरज आहे. सगळीकडे आणिबाणी सदृश्य परिस्थिती आहे. सरकारला माध्यमांनी केलेली टीका पचणी पडत नाही. माध्यमांना स्वांतत्र्याची गरज आहे. माध्यमांपासूनच स्वांतत्र्य नकोयं.
गांधीजींच्या लिखानात सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब
१९०३ पासून १९४८ पर्यंत गांधीजींनी राजकीय नेता किंवा पत्रकार या नात्याने केलेल्या लिखानात ३० कोटी लोकांच्या आशा आणि अपेक्षा दिसून येतात. आताच्या पत्रकारितेमध्ये गांधीवादी विचारांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसले आहे. तरीही आपल्याला त्यांचा संदेश समजून घेण्याची गरज आहे. त्यापुढे झुकता कामा नये. हीच १५० व्या गांधी जन्मशताब्दी निमित्त त्यांना आदरांजली असेल.
(लेखक- चंद्रकांत नायडू)
(हे लेखकाचे वैयक्तीक विचार आहेत, ईटीव्ही भारतचा याच्याशी काहीही संबध नाही)