नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये आत्तापर्यंत 120 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यातील 109 रुग्ण धोक्याबाहेर असून फक्त एक व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे. तर दोघांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या मरकज कार्यकमला उपस्थित असलेल्या 536 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर 1 हजार 810 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. एकूण 2 हजार 346 नागरिक मरकज येथून बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आलेल्या नागरिकांचे फोन नंबर पोलिसांना देण्यात आले असून पोलीस त्यांच्यावर निगराणी ठेवणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.
भारतामध्ये आत्तापर्यंत 1637 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. 133 नागरिक पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रामध्ये आढळून आले आहेत.