नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील आझादपूर भाजी मंडईशी संबंधित ११ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तर दिल्ली विभागाचे जिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
या व्यापाऱ्यांचा भाजी मंडईशी प्रत्यक्षरित्या संबध नसून आम्ही त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर भाजी मंडीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून सुरक्षेचे सर्व उपाय राबविण्यात आले आहेत. आजूबाजूच्या परिसरात जेथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे तेथील दुकाने आणि परिसर सील केल्याचे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.
लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतरही दिल्लीतील आझाद मंडी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी भाजीपाला मार्केट सुरू ठेवण्यात आले आहेत. मात्र, आता व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे.