ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

या पिकअप गाडीत 40 लोक होते. यातील 15 जण वाहनाखाली दबले होते. यापैकी 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हे सर्वजण विजयपूर तहसीलच्या ढोंढरीखुर्द आणि ढोंढरीकला गावातील गुर्जर समाजातील लोक कराहल तालुक्यातील मोरवण येथे शोकसभेत भाग घेण्यासाठी गेले होते.

मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात
मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात
author img

By

Published : Nov 14, 2020, 3:46 PM IST

शिवपुरी (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी पोलीस ठाणे परिसरातील काकरा गावाजवळ शुक्रवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याचबरोबर अनेक लोक जखमी असल्याचेही सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णवाहिकेतून पोहरी रुग्णालयात आणण्यात आले. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात

या पिकअप गाडीत 40 लोक होते. यातील 15 जण वाहनाखाली दबले होते. यापैकी 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. काकरा गावाजवळ झालेल्या भयानक रस्ता अपघाताची माहिती मिळताच शिवपुरी जिल्हाधिकारी अक्षय कुमार सिंह आणि एसपी राजेश सिंह चंदेल जिल्हा रुग्णालयात पोहोचले. येथे जखमींच्या उपचारांची व्यवस्था केली जात आहे.

अधिक माहिती अशी -

विजयपूर तहसीलच्या ढोंढरीखुर्द आणि ढोंढरीकला गावातील गुर्जर समाजातील लोक कराहल तालुक्यातील मोरवण येथे शोकसभेत भाग घेण्यासाठी गेले होते. शुक्रवारी संध्याकाळी पोरी-श्योपूर रोडवरील काकरा गावाजवळ मोरावनहून परत येत असताना सायंकाळी साधारण 6:45 वाजता एका वळणावर पिकअप वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. वाहन वेगात असल्यामुळे वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ते पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले दुःख

मुख्यमंत्री चौहान यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिवपुरीच्या पोहरी-काकरा येथील रस्ता अपघातात अनेकांना हकनाक प्राणांना मुकावे लागल्याने आपल्याला दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

  • शिवपुरी के पोहरी-ककरा रोड पर हुई सड़क दुर्घटना में कई अमूल्य जिंदगियों के असमय निधन के समाचार से मन आहत है।

    ईश्वर से दिवंगत आत्माओं को अपने श्री चरणों में स्थान देने और परिजनों को यह वज्रपात सहन करने तथा घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूं।

    — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.