हैदराबाद - संपूर्ण जगात प्रत्येक वर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागे जनतेने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष द्यावे आणि लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी आपले योगदान द्यावे, हा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता 11 जुलै 1989 मध्ये पहिल्यांदा लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पहिल्यांदा हा जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला. यानंतर प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस म्हणाले, सतत विकासासाठी अंजेडा 2030 जगाला स्वस्थ आरोग्य लाभावे, हा आहे. यानेच चांगले भविष्य निर्माण होणार आहे. तसेच आम्ही मानतो की हे मिशन, वृद्धत्व, स्थलांतर आणि शहरीकरणासह लोकसंख्यावाढीशी याचा जवळचा संबंध आहे.
- लोकसंख्या वाढीशी संबंधित मुद्दे -
- परिवार नियोजन
- लिंग समानता
- बाल विवाह
- मानवाधिकार
- आरोग्य अधिकार, लहान मुलांचे आरोग्य इ.
यासाठी जागतिक लोकसंख्या दिवस नेहमीच पुनरुत्पादक (प्रजनन) आरोग्यावर लक्ष केंद्रीत करतो.
- जागतिक लोकसंख्या दिवस 2020 वर्षाची थीम -
यावेळी कोरोना संकटाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जागतिक लोकसंख्या दिवसाची थीमचे मुख्य स्वरूप जगातील महिला आणि मुलींच्या आरोग्यासंबंधित सुरक्षेवर आधारित आहेत. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त त्रास महिलांना झाला आहे. जगभरातील पुरवठा साखळीमधील व्यत्ययांमुळे महिलांना गर्भ निरोधक साधने उपलब्ध न झाल्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.
नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीने (यूएनएफपीए) म्हटले आहे की, जर लॉकडाऊन सहा महिने राहिले आणि आरोग्य सेवांमध्ये व्यत्यय निर्माण झाल्या तर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील 47 दशलक्ष महिलांना आधुनिक गर्भ निरोधक साहित्य मिळू शकणार नाही. यामुळे सात टक्के महिला अनैच्छिकपणे गर्भवती होतील. लिंग-आधारित हिंसाचाराच्या अतिरिक्त 31 दशलक्ष प्रकरणेही वाढू शकतात. तर जननेंद्रियाशी संबंधित 20 दशलक्ष प्रकरणे आणि 13 दशलक्ष बालविवाह होऊ शकतात.
दरम्यान, 2019 या वर्षी जागतिक लोकसंख्येची थीम 'फैमिली प्लानिंग : इम्पावरिंग पीपुल, डिवेलपिंग नेशन्स' ही होती.
- जागतिक लोकसंख्या दिवस - इतिहास
1968 मध्ये जागतिक नेत्यांनी असे सुचवले होते की, जनतेला मुलांची संख्या आणि वेळ स्वतंत्रपणे आणि जबाबदारीने निश्चित करण्याचा मानवी हक्क असावा. यानंतर 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्याची सुरुवात 1989 या वर्षापासून करण्यात आली. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या संचालक परिषदेने याला मान्यता दिली होती. दरम्यान, 11 जुलै 1987 पर्यंत जगातील लोकसंख्या 5 अरबच्यावर पोहोचली होती. या पार्श्वभूमीवर जागतिक हित लक्षात घेता हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिले 10 देश (आकडेवारी 1 जुलै 2020 पर्यंतची)
देश | जनसंख्या |
---|---|
चीन | 1,39,40,15,977 |
भारत | 1,32,60,93,247 |
अमेरिका | 33,26,39,102 |
इंडोनेशिया | 2,67,02,63,66 |
पाकिस्तान | 23,35,00,636 |
नाइजीरिया | 21,40,28,302 |
बांग्लादेश | 16,26,50,853 |
रूस | 14,17,22,205 |
मेक्सिको | 12,86,49,565 |
संयुक्त राष्टाने 2019 मध्ये जाहीर केलेल्या एक अहवालानुसार, जगातील लोकसंख्येत पुढील 30 वर्षांमध्ये दोन बिलियन लोकांची भर पडण्याची शक्यता आहे. म्हणजे वर्तमानात ती 7.7 बिलियन वरुन 2050 पर्यंत 9.7 बिलियन पर्यंत पोहोचेल.
मध्यम आवृत्तीच्या प्रक्षेपणानुसार, जगातील सतत विकास लक्ष (एसडीजी) आणि निवडक देशांच्या क्षेत्रांमध्ये 1990, 2019, 2050 आणि 2100 साठी एकूण प्रजनन क्षमता -
- प्रति महिलाद्वारा मुल जन्माला घालण्याची सरासरी -
क्षेत्र | 1990 | 2019 | 2050 | 2021 |
---|---|---|---|---|
जग | 3.2 | 2.5 | 2.2 | 1.9 |
सर्वात कमी विकसित देश | 6 3. | 9 | 2.8 | 2.1 |
भूमि-बंद विकासशील देश | 5.7 | 3.9 | 2.7 | 2 |
लहान द्वीप विकासशील राज्य | 3.2 | 2.4 | 2.1 | 1.8 |
उप सहारा अफ्रीका | 6.3 | 4.6 | 3.1 | 2.1 |
उत्तर आफ्रिका आणि दक्षिणी आशिया | 4.3 | 2.4 | 1.9 | 1.7 |
मध्य आणि दक्षिणी आशिया | 4.3 | 2.4 | 1.9 | 1.7 |
पूर्वी आणि पूर्वोत्तर आशिया | 2.5 | 1.8 | 1.8 | 1.8 |
लैटिन अमेरिका आणि कैरेबियाई क्षेत्र | 3.3 | 2 | 1.7 | 1.7 |
ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलैंड | 1.9 | 1.8 | 1.7 | 1.7 |
ओशिनिया | 4.5 | 3.4 | 2.6 | 2 |
यूरोप आणि उत्तरी अमेरिका | 1.8 | 1.7 | 1.7 | 1.8 |