ETV Bharat / bharat

अरिझोनामध्ये गोळीबार, १ वर्षाच्या चिमुकल्यासह ६ जण जखमी - arizona gunfire 7 injured

एक एसयूव्ही कार घटनास्थळावर आली व त्यातून गोळीबार झाला. यावेळी फुड स्टँडवरील एका कर्मचाऱ्याने कारवर गोळीबार केला. त्यानंतर कार तेथून पसार झाली. अशी माहिती मेसा पोलिसांनी दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 18, 2020, 9:54 AM IST

मेसा (यु.एस)- अरिझोनामध्ये काही मुलांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही मुले त्यांच्या कुटुंबाबरोबर एका फुड ट्रक बाहेर जेवन करत होते. दरम्यान, अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. यात १ वर्षाचे बाळ गंभीर जखमी झाले असून त्यासह इतर सहा जणही जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये ६, ९ आणि १६ वर्षीय मुलांसह ३ व्यक्तींचा समावेश आहे. ही घटना का घडली व यामागे कोणाचा हात आहे, याबाबत पोलिसांना ठोस माहिती नाही. मात्र, संध्याकाळच्या सुमारास एक महिला आणि पुरुषामध्ये भांडण झाले होते. एक एसयूव्ही कार घटनास्थळावर आली व त्यातून गोळीबार झाला. यावेळी फुड स्टँडवरील एका कर्मचाऱ्याने कारवर गोळीबार केला, त्यानंतर कार तेथून पसार झाली. अशी माहिती मेसा पोलिसांनी दिली. दरम्यान, ही घटना खूप दु:खद असल्याची भावना मेसा पोलीसचे प्रमुख केन कॉस्ट यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमारच, अमित शाहांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.