आज शेतकरी दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करणार
नवी दिल्ली - हजारो शेतकरी रविवारी दिल्ली-जयपूर महामार्ग रोखण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत, अशी माहिती आंदोलकांनी दिली.
शेतकरी आंदोलनाचा आज 18 वा दिवस ; १४ डिसेंबरला सर्व शेतकरी नेते उपोषणाला बसणार
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलनाचा आज 18 वा दिवस आहे. केंद्र सरकार सोबतच्या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. १४ डिसेंबरला सर्व शेतकरी नेते उपोषणाला बसणार आहेत. सरकारसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, आधी तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राजस्थानचे भाजपा प्रभारी अरुण सिंह जयपूर दौर्यावर, संघटनात्मक बैठक घेतील
बिहारमध्ये आज शेतकरी परिषद
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला उत्तर म्हणून भाजप संपूर्ण बिहारमध्ये किसान संमेलन आयोजित करत आहे. ते १ डिसेंबरपासून सुरू होईल आणि २ डिसेंबरपर्यंत चालेल.
आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा
माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी आज १३ डिसेंबरला पार पडणार आहे. पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी परवानगी दिलेल्या श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह शुक्रवारी आळंदीत दाखल झाल्या आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारचा आज चहा-पाण्याचा कार्यक्रम
सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होत असून कोरोनाचे सावट अजूनही कायम असल्याने हे अधिवेशन केवळ दोनच दिवस चालणार आहे.
‘संत नामदेव इन गुरु ग्रंथ साहिब’ पुस्तकाचे आज राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुषमा नाणार संपादित ‘गुरु ग्रंथ साहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाची विशेष आवृत्ती राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश यांचा आज वाढदिवस
तेलगू चित्रपटांचा सुपरस्टार आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम करणारा अभिनेता व्यंकटेश यांचा आज वाढदिवस
आज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना होण्याची शक्यता
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने बंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी याची खातरजमा केली.
१३ तारखेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल, अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात रोहित १४ दिवसांच्या विलगीकरणात राहील.
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्याचा आज तिसरा दिवस