ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra: भाजपच्या फुटीरतावादी राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी भारत जोडो यात्रा -जयराम रमेश

'भारत जोडो' यात्रेला पक्षासाठी "जीवन संरक्षक" म्हणून संबोधून, कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (Bharat Jodo Yatra) ते म्हणाले की, ही यात्रा पक्षाला नवी संजीवनी देईल. तसेच, पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय होण्यास मदत करेल. आज या यात्रेमुळे विरोधक त्रस्त झाले आहेत असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला आहे.

जयराम रमेश
जयराम रमेश
author img

By

Published : Sep 8, 2022, 4:08 PM IST

कन्याकुमारी (तामिळनाडू) - भारतीय जनता पक्ष (BJP) ज्या प्रकारे या यात्रेवर हल्लाबोल करत आहे, त्यावरून सत्ताधारी नाराज असल्याचे स्पष्ट होत असल्याच जयराम रमेश म्हणाले आहेत.'भारत जोडो' यात्रा ही काँग्रेससाठी जीवनदायी असल्याचे सांगून ते म्हणाले की, ही यात्रा पक्ष मजबूत करेल आणि त्यात नवसंजीवनी देईल. (Jairam Ramesh criticizes BJP) "मला पूर्ण खात्री आहे की ही यात्रा काँग्रेससाठी संजीवनी, जीवनरक्षक ठरे असही ते म्हणाले आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसचे अस्तित्व आहे - १३७ वर्षांच्या इतिहासात काँग्रेस अनेक वेळा वेगवेगळ्या परिस्थितीत दिसू आली आहे. त्यामुळे हा प्रवास काही पक्षासाठी नवा नाही. या यात्रेमुळे काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय होणारे आहे असा विश्वासही रमेश यांनी व्यक्त केला आहे. आजही देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसचे अस्तित्व आहे. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष असून सत्तेत नसला तरी तो प्रत्येक परिसरात, गावागावात आहे. 'भारत जोडो यात्रे'वर भाजपच्या टीकेवर ते म्हणाले, "ही भारत जोडो यात्रा आहे. भाजप काय म्हणतोय याची मला पर्वा नाही. माझे लक्ष भारत जोडो यात्रेवर आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी - या यात्रेचा एक भाग म्हणून सकाळी 13 किमीचे अंतर कापण्यात आले आणि नेत्यांना सुचिंद्रम, कन्याकुमारी येथे पोहोचण्यासाठी सुमारे तीन तास लागले, असे ते म्हणाले. रमेश म्हणाले, "ठीक आहे, आम्ही 13-15 किमी अंतराचा अंदाज लावला होता. आज आम्ही थोडे उशिराने सुरुवात केली. (CWC) सदस्यांसह इतरही काँग्रेसचे वरिष्ठ नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत. कालपासून आम्ही सकाळी सुमारे 15 किमी चालायचे ही आमची संकल्पना आहे.

भारतीय राजकारणासाठी परिवर्तनाचा क्षण - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील 'विवेकानंद पॉलिटेक्निक' येथून 118 इतर "भारत यात्री" आणि इतर अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांसह पदयात्रेला सुरुवात केली. पक्षाने राहुलसह 119 नेत्यांना कन्याकुमारी येथून "भारत यात्रा" म्हणून नावे दिली आहेत. एकूण 3,570 किमी अंतर. काँग्रेसने बुधवारी कन्याकुमारी येथून आपल्या 'जोडो इंडिया' यात्रेची औपचारिक सुरुवात केली आणि त्यानिमित्ताने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिखित संदेशाद्वारे ही यात्रा भारतीय राजकारणासाठी परिवर्तनाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.