सध्या भारतात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि कोमोरबॅलिटी असलेल्या व्यक्तीचे कोविड विषाणूविरोधात लसीकरण सुरू आहे. त्यात एक चांगली बातमी आली आहे. भारताच्या भारत बायोटेक इंट्रानॅसल लस ( बीबीव्ही १५४) फेज १ च्या ट्रायल्स काही शहरांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यात हैदराबाद आणि नागपूरही आहे. ३ मार्च २०२१ रोजी हे दाखवण्यात आले की, भारत बायोटेक कोवॅक्सिनचा दुसरा डोसचा प्रभाव ८१ टक्के आहे. त्याच तारखेला जाहीर करण्यात आले होते की इंट्रानॅसल लसीसाठी क्लिनिकल चाचण्या मार्चमध्येच सुरू होतील आणि ७ मार्च २०२१ रोजी त्या सुरूही झाल्या. पण नाकातून दिली जाणारी ही लस आहे तरी काय? ती कसे काम करते ?टाकू एक नजर.
इंट्रानॅसल लस कसे काम करते ?
सर्वसाधारणपणे लस ही त्वचेवर सुई टोचून दिली जाते. पण लस देण्यासाठीचे इतरही मार्ग आहेत इंट्रानॅसल म्हणजे नाकावाटे, तोंडावाटे आणि त्वचेवाटे लस दिली जाते. कोविड १९शी लढण्यासाठी भारत बायोटेकने इंट्रानॅसल लस बनवली आहे. ही लस जोरदार हल्ला करणारी नाही आणि सुई नसलेली आहे. साधारणपणे विषाणूचा शरीरात प्रवेश हा नाकातून होत असतो. ही लस कोविडशी लढण्यासाठी रोग प्रतिकारक शक्तीसाठी रक्तात आणि नाकात प्रथिने तयार करते. या लसीची नाकपुड्यांमध्ये फवारणी केली जाते. ही फवारणी सुई नसलेली सीरिंज, नाकपुडीचा स्प्रे, द्रव औषध याद्वारे केली जाते. या लसीचा वापर करणे म्हणजे फक्त लसीकरण सोपे करणे नव्हे, तर ज्यांना सुईचा फोबिया आहे, त्यांच्यासाठी हे वरदानच. सुईचा वापरच नसल्याने सुईमुळे संसर्ग पसरण्याची भीतीही राहत नाही. इतर लसींपेक्षा यामधली रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहेच. शिवाय नॅसल लस ही स्वत:ही घेता येऊ शकते. सीरिंग्ज, सुया असा लसीकरणासाठीचा वैद्यकीय खर्चही ही लस कमी करते. भारत बायोटेक कंपनी काय म्हणते? इंट्रानॅसल लस तयार करणारी कंपनी अर्थात भारत बायोटेक या प्रकारच्या लसीच्या
इंट्रानॅसल लसीचे फायदे
इंट्रानॅसल लसीमुळे रोग प्रतिकार शक्तीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. जिथून संसर्ग होतो ( नाकपुडीतून ) तिथेच हा रोग प्रतिकारक शक्तीची प्रतिक्रिया दिसते. या लसीमुळे संसर्ग आणि प्रसार दोन्ही बंद केला जातो.- लस शरीरावर आक्रमण करत नाही. सुईचा वापर नसतो. यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज नाही. व्यवस्थापन करणे सुलभ जाते.
- सुईमुळे जे धोके निर्माण होऊ शकतात, त्याचे निर्मूलन ( जखमा होऊ शकतात. संसर्ग होऊ शकतो. )
- जास्त मागणी ( मुले आणि प्रौढांनी योग्य )
- जागतिक मागणी पूर्ण करायला सक्षम
म्हणूनच या लसीच्या चाचण्या पाटणा, चेन्नई, हैदराबाद आणि नागपूर इथे सुरू झाल्या आहेत. ही कंपनी सेंट्रल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया (सीटीआरआय) नुसार वरील शहरांमध्ये १७५ उमेदवारांवर लसीची चाचणी घेण्यात येणार आहेत.