ETV Bharat / bharat

देशभरात शेतकरी आंदोलनाचे पडसाद; वाचा एका क्लिकवर..

author img

By

Published : Mar 26, 2021, 8:10 AM IST

Updated : Mar 26, 2021, 7:16 PM IST

भारत बंद
भारत बंद

19:13 March 26

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने आज 'भारत बंद'चं आवाहन केले होते. देशातील विविध शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. पाहा दिवसभरातील या आंदोलनाचे अपडेट्स एका क्लिकवर..

12:52 March 26

अमृतसरमध्ये शेतकऱ्यांनी अमृतसर-दिल्ली रेल्वे ट्रॅक रोखला

शेतकऱ्यांनी अमृतसर-दिल्ली रेल्वे ट्रॅक
अमृतसर-दिल्ली रेल्वे ट्रॅक रोखला

पंजाब - किसान मजूर संघर्ष समितीच्या सदस्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या पुकारलेल्या १२ तास चाललेल्या ‘भारत बंद’ दरम्यान अमृतसरमध्ये अमृतसर-दिल्ली रेल्वे ट्रॅक रोखला.

12:35 March 26

मुंबईत काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा; नाना पटोलेंसह अनेक नेत्यांचे मंत्रालयाबाहेर आंदोलन

मुंबईत काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा; नाना पटोलेंसह अनेक नेत्यांचे मंत्रालयाबाहेर आंदोलन..

मुंबई - शेतकरी संघटनांनी घोषित केलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, आमदार पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. 

12:29 March 26

पुण्यात भारत बंदला अल्प प्रतिसाद; शेतकरी बचाव कृषी समितीकडून आंदोलन

पुण्यात भारत बंदला अल्प प्रतिसाद; शेतकरी बचाव कृषी समितीकडून आंदोलन..

पुणे - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंदचे आवाहन केले होते. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु पुणे शहरात मात्र या आंदोलनाचा कुठलाही परिणाम नसल्याचे जाणवत आहे. शहरातील दुकाने कार्यालय आणि जनजीवन नेहमीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातही शेतकर्‍यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता. पुण्यातही भारत बंदला शेतकरी बचाव कृती समितीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्या पाठिंब्याचा किती कार्यक्रम म्हणून शहरातील चौकात एकाच वेळी केंद्र सरकारच्या जुलमी धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

12:14 March 26

दिल्लीच्या चिल्ला सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात

दिल्ली - शेतकऱ्यांच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चिल्ला सीमेवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावरून लोकांना येण्या-जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. आंदोलकांनी दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्याची चेतावणी दिल्याने प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. 

12:11 March 26

आंदोलकांनी चंदीगड-अंबाला महामार्ग रोखला

आंदोलकांनी चंदीगड-अंबाला महामार्ग, bharat band
आंदोलकांनी चंदीगड-अंबाला महामार्ग रोखला

पंजाबमध्ये संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या 12 तासांच्या ‘भारत बंद’ दरम्यान आंदोलकांनी चंदीगड-अंबाला महामार्ग रोखून धरला आहे.  

11:52 March 26

भारत बंद दरम्यान सिंघू सीमेवरील शेतक्यांनी रस्ता रोखला.

11:48 March 26

शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या भारत बंदमुळे दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंद झालेल्या मेट्रो स्थानकांमध्ये टिकरी सीमा, पंडित श्रीराम शर्मा, बहादूरगड शहर आणि ब्रिगेडियर होशियारसिंग मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.

11:19 March 26

शताब्दीच्या चार गाड्या रद्द

तिन्ही कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम पंजाब आणि हरियाणामध्येही दिसून येतो. येथील 31 ठिकाणी शेतकरी आंदोलनकर्ते धरणे लावून बसले आहेत. अंबाला आणि फिरोजपूर विभागात रेल्वे सेवा प्रभावित होत आहेत. त्याचबरोबर शताब्दीच्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

11:19 March 26

पंजाब : अकाली दल चक्का जाममध्ये सामील

कृषी कायद्याविरूद्ध पंजाबमधील काँग्रेसबरोबरच आता अकाली दलही चक्का जामची तयारी करत आहे. शुक्रवारी अकाली दलाचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग -9 रोखण्याचा प्रयत्न केला.  

10:50 March 26

नोएडा चिल्ला सीमेवर भारी सुरक्षा व्यवस्था

 संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंदचे आवाहन दिले. या आवाहनाला दिल्लीच्या सर्व भागात सुरक्षा एजन्सीज सतर्क आहेत. दिल्लीचा नोएडा चिल्ला बॉर्डर भारी सुरक्षा करण्यात आली आहे.  रस्ता पूर्णपणे बंद झालेला नाही.  थोड्या प्रमाणात नागरिकांची रहदारी सुरू आहे.

10:13 March 26

राष्ट्रीय जनता दलाने बिहार बंदला हाक दिली

आरजेडी कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला.

विधानसभेत झालेल्या गदारोळामुळे आज राष्ट्रीय जनता दलाने बिहार बंदची हाक दिली आहे. मुजफ्फरपुरात आरजेडी कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला.

10:07 March 26

भारत बंद दरम्यान काही आंदोलकांचा एक गट गाझीपूर सीमेवर नृत्य करताना पाहायला मिळाला.

शेतकऱ्यांचे नृत्यू

10:05 March 26

भारत बंदला राहुल गांधींनी पाठिंबा दर्शविला

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. राहुल गांधींनी ट्वीट केले,  की सत्याग्रह हा अत्याचार, अन्याय आणि अहंकार संपवतो.  भारताचा इतिहास याचा साक्षी आहे. देशहितासाठी हे आंदोलन शांततेत झाले पाहिजे.

10:05 March 26

भारत बंद दरम्यान शेतकऱ्यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर-हाजीपूर महामार्ग रोखला

09:31 March 26

सरकारशी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार - शेतकरी नेता

रतीय किसान युनियनचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष राजवीर सिंह जादौन

आंदोलनाला चार महिने होत आहेत. भारत बंदला सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे. यातून सरकारला संदेश जाईल. आम्ही सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष राजवीर सिंह जादौन यांनी म्हटलं. 

09:09 March 26

ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये रेल्वे रोको

रेल्वे रोको
रेल्वे रोको

09:06 March 26

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भारत बंदला पाठिंबा, एकदिवसीय उपोषण करणार

08:12 March 26

केंद्राच्या शेतीच्या कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अंबालामद्ये प्रतिसाद मिळाला. शाहपूरजवळ जीटी रोड आणि रेल्वे ट्रॅक आंदोलकांनी रोखला.

अंबालामद्ये शेतकऱ्यांचे आंदोलन
अंबालामद्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

08:06 March 26

गल्ली ते दिल्ली आज बंद; शेतकऱ्यांचे आवाहन; रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने आज 'भारत बंद'चं आवाहन केलं आहे. याचा परिणाम  रेल्वे आणि रस्ते वाहतूक सेवांवर होण्याची शक्यता असून शुक्रवारी देशाच्या काही भागांत बाजारपेठा बंद राहतील.  

सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा स्थगित राहतील. दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी शेतकरी नेते दर्शन पाल यांनी दिली. आंदोलक संघटनांनी शांततेत आंदोलन करावे आणि 'बंद'च्या वेळी कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर वादविवाद आणि संघर्षात सहभागी होऊ नये, असे आवाहन आंदोलकांना करण्यात आले. राजधानी दिल्ली, हरयाणा आणि पंजाबमध्ये पोलिसांना सतर्क करण्यात आलं आहे.

संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार संघटना आणि परिवहन व इतर संघटनांनी शेतकरी संघटनांच्या 'भारत बंद'च्या आवाहनाला पाठिंबा दर्शविला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या बंद पुकारण्यासाठी विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविला आहे. तर ज्या राज्यात निवडणुका होत आहेत. ती राज्य भारत बंदमधून वगळण्यात आली आहेत.

कॉन्फेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्सचा 'भारत बंद'मध्ये सहभाग नाही -

देशातील आठ कोटी व्यापाऱ्याचे प्रतिनिधीत्व असणारे कॉन्फेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्सने 'भारत बंद'मध्ये भाग घेतला नाही. आम्ही उद्या 'भारत बंद'मध्ये भाग घेणार नाही. दिल्ली आणि देशाच्या इतर भागात बाजारपेठा खुल्या राहतील. शेतकरी आंदोलन फक्त संवाद प्रक्रियेद्वारे सोडवता येतील. यासाठी चर्चा व्हायला हवी, सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले.

कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी -

प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर येथे तळ ठोकून आहेत. शेतकरी कायदे रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे. तीन शेतीविषयक कायदे रद्द करणे, शेतकर्‍यांवरील सर्व पोलीस खटले रद्द करणे, डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती कमी करणे, या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.  निषेध करणार्‍या संघटना आणि सरकार यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तोडागा निघालेला नाही. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. तर  सरकारने 12-18 महिने शेती कायदे स्थगित करण्याची ऑफर शेतकऱ्यांना दिली होती. ती शेतकरी संघटनांनी नाकारली.

Last Updated : Mar 26, 2021, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.