हरिद्वार (उत्तराखंड) : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत भल्याभल्यांच्या विकेट घेतल्या आहेत. आज ते पहिल्यांदाच क्रिकेटच्या खेळपट्टीवर हातात बॅट घेऊन उतरले. मात्र राजकारणातील हा अष्टपैलू खेळाडू क्रिकेटच्या पिचवर सपशेल अपयशी ठरला. भगतसिंह कोश्यारी फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर बीट झाले!
भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन : वास्तविक, भगतसिंह कोश्यारी आज (१ नोव्हेंबर) हरिद्वार जिल्हा कारागृहात एका कार्यक्रमासाठी पोहोचले होते. यावेळी जिल्हा कारागृहात आयोजित क्रिकेट स्पर्धेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी हरिद्वार जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधीक्षक मनोज कुमार आर्य यांच्या विनंतीवरून भगतसिंह कोश्यारी यांनी क्रिकेट खेळण्याचं मान्य केलं.
पहिल्याच चेंडूवर बीट झाले : मनोज कुमार आर्य यांनी भगतसिंह कोश्यारी यांना पहिला चेंडू टाकला. मात्र ते या चेंडूवर शॉट मारण्यात चुकले. पहिल्याच चेंडूवर मात मिळाल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी हातातील बॅट खाली ठेवली आणि राजकारणातच हात आजमावण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्रीही पहिल्याच चेंडूवर आऊट झाले होते : याआधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील क्रिकेट खेळताना दिसले होते. धामी नैनितालच्या भेटीदरम्यान मुलांसोबत क्रिकेट खेळले. मात्र मुलांनी पहिला चेंडू टाकताच ते त्यावर बाद झाले! तरी यानंतर त्यांनी भरपूर चौकार आणि षटकार मारले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बराच वेळ या लहान मुलांसोबत क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळल्यानंतर पुष्कर सिंह धामी यांनी चहाच्या दुकानात पर्यटकांसाठी चहा देखील तयार केला होता.
हेही वाचा :