किन्नोर (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात रविवारी झालेल्या भूस्खलनात 9 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जयपूरमधील आयुर्वेद डॉक्टर दीपा शर्माही सामील आहे. डॉक्टर दीपाने मृत्यूच्या काही मिनिट आधी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून लोक अश्रू ढाळत आहेत.
डॉ. दीपा शर्मा (Dr Deepa Sharma's last tweet ) ने काल दुपारी 12.59 वाजता केलेले शेवटचे ट्वीट सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटिझन्सला दीपाला श्रद्धांजली देत आहेत. कुमार विश्वाससह अनेक लोकांनी ट्विट करून डॉ. दीपा शर्मा हिच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
34 वर्षीय डॉ. दीपा जयपूरहून हिमाचलच्या निसर्गरम्य व मनमोहक पर्वतरागांचे सौंदर्य पाहण्यासाठी आली होती. मात्र तिला माहीत नव्हते की या निसर्गरम्य ठिकाणीच तिच्या जीवनाचा यात्र संपणार आहे. दीपा तिच्या हिमाचल ट्रीपचे फोटो शेअर करत होती. त्यावेळी झाल्या भूस्खलनात तिचे वाहन अडकले व तिचा दुदैवी अंत झाला.
दुर्घटनेच्या काही वेळापूर्वी दीपाने ट्वीट केले होते, की आम्ही भारताच्या अंतिम प्वाइंटवर उभे आहोत. जेथे सामान्य व्यक्तीला जाण्याची परवानगी आहे.