ETV Bharat / bharat

Solar Eclipse : येणाऱ्या सूर्यग्रहणासाठी पाच दिवस आधीच तुळस तोडून ठेवावी लागणार - Do not do this during eclipse

2022 मधले दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण म्हणजे 25 ऑक्टोबर 2022 ला आहे. हे ग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आहे. सूर्यग्रहणात तुळशीला फार महत्त्व ( Tulsi important in solar eclipse) आहे. त्यादिवशी घरातील प्रत्येक गोष्टीत म्हणजेच पाण्यात, जेवणात तुळस टाकली जाते. तुळस अन्नात आणि पाण्यात टाकल्यास ते शुद्ध राहते अशी मान्यता आहे. मात्र यंदा तुळस हवी असेल तर नागरिकांना पाच दिवस आधी तुळस तोडून ठेवावी लागणार ( Cut basil three days before solar eclipse) आहे.

solar eclipse
solar eclipse
author img

By

Published : Oct 20, 2022, 5:36 PM IST

Updated : Oct 21, 2022, 6:17 PM IST

नवी दिल्ली : 2022 मधले दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण म्हणजे 25 ऑक्टोबर 2022 ला आहे. हे ग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आहे. सूर्यग्रहणात तुळशीला फार महत्त्व ( Tulsi important in solar eclipse) आहे. त्यादिवशी घरातील प्रत्येक गोष्टीत म्हणजेच पाण्यात, जेवणात तुळस टाकली जाते. तुळस अन्नात आणि पाण्यात टाकल्यास ते शुद्ध राहते अशी मान्यता आहे. मात्र यंदा तुळस हवी असेल तर नागरिकांना तीन दिवस आधी तुळस तोडून ठेवावी लागणार ( Cut basil three days before solar eclipse) आहे.

सूर्यग्रहण : पाच दिवस आधी तुळस तोडून ठेवण्यामागे एक मोठ कारण आहे. ते म्हणजे हिंदू परंपरेनुसार आवस्येला तुळस तोडणे पाप असते. सूर्यग्रहणाच्या आदल्या दिवशी दिवळी आहे. म्हणजेच आमावस्या आहे. त्यामुळे तुळस तोडू शकत नाही. त्याशिवाय 23 तारखेला रविवार आहे. त्याही दिवशी आपल्या संस्कृतीत तुळस तोडत नाहीत. त्यामुळे आता नागरिकांना 22 तारखेलाच तुळस तोडून ठेवावी लागणार आहे. त्यामुळे आता ती व्यवस्थित ठेवायची असेल तर कशी ठेवावी असा मोठा प्रश्न समोर आहे. जर त्या दिवशी तुळस तोडून ठेवणे जमले नाही तर काल तोडून ठेवलेली तुळस फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून तुम्ही ती सूर्यग्रहणादिवशी वापरू शकता.

सूर्यग्रहणात तुळशीचे महत्त्व : तुळशीची पाने अन्न आणि पाण्यात ( Basil is added in food and water ) टाकतात. जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव अन्न पाण्यावर पडू नये. जेणेकरून ग्रहणानंतर त्याचे सेवन करता येईल. घराचे मंदिर झाकून ठेवा. यादरम्यान मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवले जातात. ग्रहणकाळात जास्तीत जास्त वेळ देवपूजेत घालवावा. ग्रहणानंतर स्नान करतात.

ग्रहण काळात हे करू नका : ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू ( Do not do this during eclipse ) नये. ग्रहण काळात सुईमध्ये धागा घालण्यास मनाई असते. कापण्याचे आणि सोलण्याचे काम करत नसल्याने सूर्यग्रहण काळात अन्न शिजवले जात नाही. विशेषत: गरोदर महिलांनी यावेळी चाकू, कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये.

तुळस तोडण्याचे नियम : तुळशीला तोडण्याशी संबंधित काही तारखा खाली दिल्या आहेत. त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. ग्रहण काळात 25 ऑक्टोबरला तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे अयोग्य आहे. 24 ऑक्टोबरला दिवाळी आहे.या दिवशी अमावस्या येते. अमावस्येला रात्रंदिवस तुळशीला स्पर्श करणे हे ब्रह्महत्या समान मानले जाते. म्हणजेच 24 तारखेला तुळशीला हातही लावता येणार नाही. 23 ऑक्टोबर हा रविवार असून पुराणांमध्ये रविवार हा भगवान सूर्याचा दिवस मानला जातो. देवी तुळशी या दिवशी भगवान विष्णूचे व्रत करते. या दिवशीही तुळशीला तोडू दिला जात नाही. अन्यथा, दुर्दैवाचा धोका आहे. 21 ऑक्टोबर रोजी रमा एकादशीचा योग आहे. या दिवशी उपवास केला जातो. एकादशीला तुळशीची पूजा केली जाते. या दिवशीही तुळस तोडता येत नाही.

Last Updated : Oct 21, 2022, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.