ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : बहादुरशाह जफर यांचा ब्रिटिशांविरोधातील लढा, वाचा सविस्तर... - रंगून

ब्रिटीश राजवटीविरोधात बंडखोरीचा आवाज उठविणारे शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांची कहाणी आजही लोकांना प्रेरणा देते. ते सम्राट होते, जर त्यांना हवे असते, तर केवळ आपले राज्य टिकवण्यासाठी ब्रिटिशांसोबत हातमिळवणी करुन पिढ्यानपिढ्या चालत आलेला रुबाब त्यांना कायम राखता आला असता. मात्र बहादूर शाह जफर यांनी देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठीण मार्ग निवडला.

स्वातंत्र्याची 75 वर्षे
स्वातंत्र्याची 75 वर्षे
author img

By

Published : Sep 12, 2021, 6:07 AM IST

दिल्ली - जेव्हा स्वातंत्र्यप्रेमींची गाथा सांगितली जाते, तेव्हा आपसुकच शेवटचे मुघल बादशहा बहादुरशाह जफर यांचा उल्लेख होणार हे निश्चितच आहे. एक असे बादशाह ज्यांना सत्तेची लालसा नव्हती. मात्र राष्ट्रवादाविषयी आत्मीयता होती. ज्यांनी ब्रिटिश राजवटीसमोर अनेक आव्हाने उभी केली. ज्यामुळे ब्रिटिशांना बहादूरशाह जफर यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची भीती जाणत राहिली. यामुळेच ब्रिटिशांनी त्यांची शेवटची इच्छा देखील पूर्ण होऊ दिली नाही आणि त्यांना देशाच्या मातीत दफन करण्याऐवजी रंगूनमध्येच गुप्तपणे पुरण्यात आले.

बहादुरशाह जफर यांचा ब्रिटिशांविरोधातील लढा

स्वातंत्र्यासाठी अत्याचार सहन करणारा राजा

ब्रिटीश राजवटीविरोधात बंडखोरीचा आवाज उठविणारे शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांची कहाणी आजही लोकांना प्रेरणा देते. ते सम्राट होते, जर त्यांना हवे असते, तर केवळ आपले राज्य टिकवण्यासाठी ब्रिटिशांसोबत हातमिळवणी करुन पिढ्यानपिढ्या चालत आलेला रुबाब त्यांना कायम राखता आला असता. मात्र बहादूर शाह जफर यांनी देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठीण मार्ग निवडला. साहजिकच आहे, ब्रिटिशांना त्यांच्याविरुद्धचे हे बंड असल्याचे कळाले आणि त्यांनी इतके अत्याचार केले की आजही त्याची कथा ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. बहादूर शाह जफर, यांनी ब्रिटिशांशी लढण्यात आयुष्याचा शेवटचा टप्पा घालवला. बहादूर शाह जफर यांना बादशाह पदाचा गौरव सोडताना आणि तुरुंगात असताना इतक्या अत्याचाराचा सामना करावा लागला, की जेव्हा त्यांना भूक लागली, तेव्हा इंग्रजांनी त्यांच्या मुलांचे डोके कापले आणि त्यांना ते एका ताटात दिले. अशा पित्याची कथा ज्याने देशासाठी आपल्या मुलांचे बलिदान दिले. यावरुन कळते की त्या काळात स्वातंत्र्य प्रेमींच्या हृदयात स्वातंत्र्याचा अर्थ किती महत्त्वाचा होता.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : जालियनवाला बाग हत्याकांड नेमकं का घडलं, जाणून घ्या...

असा राहिला बहादूर शाह जफर यांचा संघर्ष

24 ऑक्टोबर 1775 रोजी जन्मलेले, बहादूर शाह जफर 82 वर्षांचे होते. त्यांनी ब्रिटिशांशी लढणाऱ्या बंडखोर सैनिकांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांचे वडील अकबर शाह द्वितीय आणि आई लालबाई होत्या. वडिलांच्या मृत्यूनंतर, जफर 18 सप्टेंबर 1837 मध्ये मुघल सम्राट झाले. मात्र तोपर्यंत दिल्लीची सत्ता खूपच कमकुवत झाली होती आणि मुघल बादशाह नाममात्र सम्राट राहिले होते. मेरठच्या सैनिकांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी त्यांना आपला नेता म्हणून निवडले. मात्र, ब्रिटिशांच्या मुत्सद्दीपणामुळे हे युद्ध लवकरच संपले आणि दिल्ली लगेच त्यांच्या हाताबाहेर गेली. जफर यांना हुमायूनकडे आश्रय घ्यावा लागला. मात्र ब्रिटिश अधिकारी विल्यम हडसनने कट रचून त्यांना अटक केली. ब्रिटिशांनी जफर यांच्यावर राजद्रोह आणि खुनाचे आरोप लावले. 27 जानेवारी 1858 ते 09 मार्च 1858 पर्यंत, म्हणजे सुमारे 40 दिवस त्यांच्यावर खटला चालला. त्यानंतर त्यांना रंगूनला हद्दपार करण्यात आले. इतिहासकारांच्या मते, या मागचे कारण हे होते की जर त्यांना भारतात ठेवले गेले तर ते बंडाचे केंद्र बनू शकले असते.

बहादूर शाह जफर यांची ब्रिटिशांना होती भीती

कैदेत असताना, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांच्याकडे एकच माध्यम होते आणि ते होते कविता. परंतू ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात पेन, प्रकाश आणि कागदाचीही व्यवस्थआ केली नाही. मात्र जफर यांनी विटांच्या तुकड्यांचे पेन आणि कागदासाठी भिंतीची वापर करत गझल लिहिल्या. बहादूर शाह जफर आपल्या देशावर खूप प्रेम करायचे. त्यांची शेवटची इच्छा होती की, त्यांना मेहरौली येथील जफर महलमध्ये दफन करण्यात यावे. मात्र असे होऊ शकले नाही. 7 नोव्हेंबर 1862 रोजी रंगूनच्या तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना रंगूनमधील स्मशानभूमीत पुरण्यात आले. ब्रिटिशांना याची भीती होती की, बहादूर शाह यांच्या निधनाची माहिती जर भारतभर पसरली तर, पुन्हा एकदा बंड उसळू शकते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी गुप्त पद्धतीने पार पडले. 1907 मध्ये जफर यांचे थडगे बांधण्यात आले आणि तिथे एक शिलालेख लावण्यात आला. परंतु 1991 मध्ये उत्खनन करताना असे आढळून आले की, प्रत्यक्ष थडगे तिथून 25 फूट दूर आहे. आता लोक त्याला जफर यांचा दर्गा म्हणून ओळखतात आणि म्यानमारमधील बहादूर शाह संग्रहालय समिती या स्थळांची देखरेख करण्याचे काम करते. बहादूर शाह जफर यांचे नाव भारतात मोठ्या आदराने घेतले जाते. दिल्लीमध्ये अनेक रस्ते आणि पार्कला त्यांचे नाव देण्यात आले आहेत. बांग्लादेशांतील ढाका येथील व्हिक्टोरिया पार्कचे नाव बदलत बहादूर शाह जफर पार्क असे ठेवले आहे. एखादा राजा आपल्या देशासाठी अशा प्रकारे बलिदान देतो, अशी कहाणी क्वचितच ऐकायला मिळते. ईटीव्ही भारत अशा व्यक्तींच्या शौर्याची गाथा मांडत आहे. ज्यांच्यामुळे आज तुम्ही आम्ही स्वातंत्र्याची पंच्चाहत्तरी साजरी करत आहोत.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडणारे अठरागडचे वीर, वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.