म्हैसूर - योगसाधकाने तब्बल 42 मिनीटे कडक उन्हात एकटक सुर्याकडे पाहण्याचा विक्रम केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बदरी नारायण असे सुर्याकडे एकटक 42 मिनीटे पाहुन विक्रम करणाऱ्या साधकाचे नाव आहे. त्याने ही विक्रम शहरातील किल्ले अंजनेय मंदिरासमोर केला. बदरी नारायण याला सलग सुर्याकडे पाहुन विश्वविक्रम करायचा असल्याचे त्याने सांगितले आहे.
बदरी नारायणने आईच्या प्रेरणेवरुन केला विक्रम : बदरी नारायण यांनी हा विक्रम आपल्या आईच्या प्रेरणेवरुन केल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतला दिली. रथ सप्तमीला बदरी नारायणच्या आईचा वाढदिवस असतो. त्यामुळे हे साहस मी माझ्या आईला समर्पित करत असल्याचेही बदरी नारायणने यावेळी सांगितले. मी माझ्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हा विक्रम मी माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्राचीन स्थळांवर योग : बदरी नारायण यांनी आतापर्यंत देशासह परदेशातीलही अनेक प्राचीन स्थळांवर योग केले आहेत. यात त्यांनी 1,300 पेक्षा जास्त प्राचीन स्थळांवर शिर्षासन योग केले आहेत. यात कंबोडिया, मलेशिया आणि भारतातील अनेक प्राचीन स्थळांचाही समावेश आहे. त्यांच्या साहसासाठी अनेक संस्थांनी त्यांना लिंक अवॉर्ड, आशिष वर्ल्ड रेकॉर्ड, एलिट वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे धोकादायक : उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे बघून प्राणायाम करणे अत्यंत धोकादायक असल्याचे बोलले जाते. मात्र त्याचे काही फायदे असल्याचेही योग साधक सांगतात. या प्रक्रियेला आपण सूर्यकिरण क्रिया म्हणतो. अशा प्रकारची क्रिया आपल्या मेंदूच्या मागील भागाला सक्रिय करत असल्याचेही बोलले जाते. बदरी नारायण यांनी हे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक जीवनासाठी खूप उपयुक्त असल्याचे सांगितले. या क्रियेद्वारे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीचा पुरवठा होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जागतिक विक्रमाचा प्रयत्न : सूर्योदयाच्या अर्धा तास आधी आणि सूर्यास्ताच्या अर्धा तास आधी सूर्य उघड्या डोळ्यांनी पाहता येतो. मात्र दुपारी बारा वाजता उघड्या डोळ्यांनी सुर्य पाहणे धोकादायक आहे. अशा प्रयत्नात कोणीही सहभागी होऊ नये, अशी विनंती त्यांनी बदरी नारायण यांनी नागरिकांना केली. दुपारी 12 ते 12:42 पर्यंत उघड्या डोळ्यांनी त्राटक प्राणायाम करून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. तो रेकॉर्डसाठी पाठवणार असल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतला दिली.
हेही वाचा - Republic Day: कर्तव्यपथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुमदुमला जयघोष ; चित्ररथाने जिंकली मने