साबरकांठा (गुजरात) : गुजरातच्या हिंमतनगर येथे एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका खासगी रुग्णालयात दोन नाक असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. ही अत्यंत दुर्मीळ अशी घटना असून यामुळे संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आले आहे.
बाळाला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले : डॉक्टरांनी सांगितले की, सध्या बाळाची प्रकृती सामान्य आहे. मात्र त्याला उपचारासाठी दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुलाची प्रकृती चांगली असल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
बाळाचा दोन नाकांसह जन्म : शुक्रवारी गुजरातच्या हिंमतनगर येथील एका खासगी रुग्णालयात दोन नाक असलेल्या बाळाचा जन्म झाल्याने डॉक्टरांसह कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, स्थानिक डॉक्टरांनी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर बाळाची प्रकृती चांगली झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दर 8,000 ते 15,000 बाळांपैकी एक बालक अशा प्रकारे जन्माला येते, ज्याचे शरीराचे अवयव वाढलेले असतात. परिणामी अशी परिस्थिती मुलासाठी तसेच त्याच्या कुटुंबासाठी चिंतेचा विषय बनते. सध्या या मुलाची प्रकृती चांगली आहे.
ऑपरेशन नंतर मूल होईल सामान्य : या प्रकरणावर बालरोगतज्ज्ञ धवल पटेल म्हणाले की, आता काही दिवसांनंतर ऑपरेशनच्या माध्यमातून या बाळाला पुन्हा नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, या टप्प्यावर मुलाची प्रकृती सामान्य असल्यास, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. ते म्हणाले की, जनुकीय आजारांमुळे असे एखादे बाळ एकापेक्षा जास्त अवयव घेऊन जन्माला येते. सहसा अशा बाळांना विविध ऑपरेशन्सद्वारे सामान्य स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्याचवेळी त्यासाठी कुटुंबाची पूर्ण सहमती देखील तितकीच आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तसेच अशा बालकांना पुन्हा जीवनात काही त्रास होत नाही असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :