ETV Bharat / bharat

काबूलमधील शीख गुरुद्वारा कर्ते परवानवर हल्ला, अनेकजण ठार झाल्याची भीती

author img

By

Published : Jun 18, 2022, 11:58 AM IST

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुद्वारा कर्ता पर्वचे अध्यक्ष गुरनाम सिंग यांनी सांगितले की, शीख गुरुद्वाराच्या परिसरात गोळीबाराचे आवाज येत होते.

काबूलमधील शीख गुरुद्वारा कर्ते परवानवर हल्ला, अनेकजण ठार झाल्याची भीती
काबूलमधील शीख गुरुद्वारा कर्ते परवानवर हल्ला, अनेकजण ठार झाल्याची भीती

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुद्वारा कर्ता पर्वचे अध्यक्ष गुरनाम सिंग यांनी सांगितले की, शीख गुरुद्वाराच्या परिसरात गोळीबाराचे आवाज येत आहेत. अनेक स्फोटांचे आवाजही ऐकू आले. स्फोटामुळे आकाशात धुराचे लोट दिसत आहेत. मनजिंदर सिरसा यांनीही या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, अफगाणिस्तानातील काबुलमधील गुरुद्वारा कर्ता पर्वचे भयानक दृश्य, ज्यावर आज सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुरुद्वारा साहिब संकुलात अनेक स्फोट झाले.

  • Breaking: Gurdwara Karte Parwan in Kabul, Afghanistan attacked by terrorists early morning today. Multiple blasts reported at Gurdwara Sahib premises. Had a talk with Gurnam Singh, President of Gurdwara Karte Parwan. He pleaded for global support for Sikhs in Afghanistan@ANI pic.twitter.com/bnYPMciyI3

    — Manjinder Singh Sirsa (@mssirsa) June 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुरुद्वारा साहिब येथे सर्वांच्या कल्याणासाठी शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली गेली. दहशतवादी संघटना ISIS च्या काही हल्लेखोरांनी गुरुद्वारामध्ये घुसून तेथील रहिवाशांची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की, हल्ल्याच्यावेळी एका ग्रंथीसह 10 लोक गुरुद्वारामध्ये उपस्थित होते. सतत गोळीबार आणि स्फोटांचे आवाज येत आहेत. मात्र, गुरुद्वारामध्ये नेमके किती लोक आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.

  • Alarming news from #Kabul armed militants likely from #ISIS as per Gurnam Singh the president of Gurdwara,have entered Karte Parwan Gurudwara.He is weeping & many of those residing in Gurdwara have been killed as per him .Requesting @narendramodi ji & @MEAIndia for SOS assistance pic.twitter.com/5iEtCLMTwH

    — Puneet Singh Chandhok (@PSCINDIAN) June 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

Alarming news from #Kabul armed militants likely from #ISIS as per Gurnam Singh the president of Gurdwara,have entered Karte Parwan Gurudwara.He is weeping & many of those residing in Gurdwara have been killed as per him .Requesting @narendramodi ji & @MEAIndia for SOS assistance pic.twitter.com/5iEtCLMTwH

— Puneet Singh Chandhok (@PSCINDIAN) June 18, 2022 ">

काही माध्यमातील वृत्तानुसार, तालिबानकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. 3 हून अधिक स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाण मीडियाच्या वृत्तानुसार, या हल्ल्यादरम्यान मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि स्फोट झाले आहेत. हा स्फोट कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. तालिबानने या हल्ल्यावर भाष्य केलेले नाही.

हेही वाचा - दहशतवाद्यांचे लाड पाकिस्तानला भोवले.. FATF ने दिला मोठा झटका.. 'ग्रे' लिस्टमध्येच राहणार

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुद्वारा कर्ता पर्वचे अध्यक्ष गुरनाम सिंग यांनी सांगितले की, शीख गुरुद्वाराच्या परिसरात गोळीबाराचे आवाज येत आहेत. अनेक स्फोटांचे आवाजही ऐकू आले. स्फोटामुळे आकाशात धुराचे लोट दिसत आहेत. मनजिंदर सिरसा यांनीही या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, अफगाणिस्तानातील काबुलमधील गुरुद्वारा कर्ता पर्वचे भयानक दृश्य, ज्यावर आज सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुरुद्वारा साहिब संकुलात अनेक स्फोट झाले.

  • Breaking: Gurdwara Karte Parwan in Kabul, Afghanistan attacked by terrorists early morning today. Multiple blasts reported at Gurdwara Sahib premises. Had a talk with Gurnam Singh, President of Gurdwara Karte Parwan. He pleaded for global support for Sikhs in Afghanistan@ANI pic.twitter.com/bnYPMciyI3

    — Manjinder Singh Sirsa (@mssirsa) June 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुरुद्वारा साहिब येथे सर्वांच्या कल्याणासाठी शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली गेली. दहशतवादी संघटना ISIS च्या काही हल्लेखोरांनी गुरुद्वारामध्ये घुसून तेथील रहिवाशांची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की, हल्ल्याच्यावेळी एका ग्रंथीसह 10 लोक गुरुद्वारामध्ये उपस्थित होते. सतत गोळीबार आणि स्फोटांचे आवाज येत आहेत. मात्र, गुरुद्वारामध्ये नेमके किती लोक आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.

  • Alarming news from #Kabul armed militants likely from #ISIS as per Gurnam Singh the president of Gurdwara,have entered Karte Parwan Gurudwara.He is weeping & many of those residing in Gurdwara have been killed as per him .Requesting @narendramodi ji & @MEAIndia for SOS assistance pic.twitter.com/5iEtCLMTwH

    — Puneet Singh Chandhok (@PSCINDIAN) June 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काही माध्यमातील वृत्तानुसार, तालिबानकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. 3 हून अधिक स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाण मीडियाच्या वृत्तानुसार, या हल्ल्यादरम्यान मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि स्फोट झाले आहेत. हा स्फोट कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. तालिबानने या हल्ल्यावर भाष्य केलेले नाही.

हेही वाचा - दहशतवाद्यांचे लाड पाकिस्तानला भोवले.. FATF ने दिला मोठा झटका.. 'ग्रे' लिस्टमध्येच राहणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.