ETV Bharat / bharat

काबुल विमानतळावर दुर्घटना; अफगाणिस्तानातून पळण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 16, 2021, 2:57 PM IST

Updated : Aug 16, 2021, 3:46 PM IST

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येत असल्याने अफगाणि नागरिकांमध्ये दहशत आहे. अफगाणि नागरिकांनी देश सोडून जाण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत.

काबुल विमानतळावर दुर्घटना
काबुल विमानतळावर दुर्घटना

हैदराबाद - तालिबानींची अफगाणिस्तानात सत्ता येत असल्याने अनेक चिंतातूर नागरिकांनी अफगाणिस्तानातून पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जात असताना शेकडो नागरिकांनी खेचाखेच केली. यावेळी 5 जणांचा मृत्यू झाला.

काबुल विमानतळावर नागरिकांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. काबुलचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अमेरिकेच्या सैन्यदलाच्या ताब्यात आहे. अमेरिकेच्या सैन्यदलाने हवेत गोळीबार केल्यानंतर गर्दीची पांगापांग झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

हेही वाचा-सदैव अटल : अटलबिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी; त्यांच्याविषयी काही खास गोष्टी!

काय आहे अफगाणिस्तानात स्थिती?

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अराजकता आणि बिघडलेल्या परिस्थितीमुळे रविवारी (१५ ऑगस्ट) राजीनामा दिला आहे. अशरफ गनी यांनी अखेर तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान सरकारने इस्लामी अतिरेक्यांना शरण आल्यानंतर अली अहमद जलाली यांना नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-Coronil controversy : बाबा रामदेवच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्ट करणार सुनावणी

अफगाण तालिबानच्या ताब्यात जाणार?

अतिरेक्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील बऱ्याच भागांवर कब्जा केला आहे. आता ते राजधानी काबूलपासून फक्त 11 किलोमीटर दक्षिणेस सरकारी सैन्याशी लढत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सर्व बाजूंनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी तालिबानला आक्रमकता थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफागाणिस्तानच्या शेजारी देशांना आपल्या सीमा निर्वासितांसाठी खुल्या ठेवण्याचा आग्रह केला आहे.

हेही वाचा-'I Love Pakistan' लिहिलेले फुगे पंजाबमध्ये शेतात सापडले

कोण आहेत तालिबान?

अफगाणिस्तानात तालिबानचा उदय 90 च्या दशकात झाला. सोव्हिएत सैन्य परत आल्यानंतर तेथे अराजकाचे वातावरण निर्माण झाले, ज्याचा फायदा तालिबानने घेतला. त्यानंतर लगेच तालिबानने दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानातून आपला प्रभाव वाढवला. सप्टेंबर 1995 मध्ये तालिबानने इराणच्या सीमेला लागून असलेला हेरात प्रांत काबीज केला. 1996 मध्ये अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरून काढून काबूलवर कब्जा केला होता.

Last Updated : Aug 16, 2021, 3:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.