ETV Bharat / bharat

Asian Cricket Council : आशियाई क्रिकेट परिषदेकडून पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांना चोख प्रत्यूत्तर; वाचा सविस्तर

author img

By

Published : Jan 6, 2023, 8:15 PM IST

जय शाह यांच्यावर टीका केल्या नंतर आशियाई क्रिकेट परिषदेकडून पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांना प्रत्यूत्तर देण्यात आले ( Asian Cricket Council Slam Najam Sethi ) आहे. कॅलेंडर सर्व सहभागी सदस्यांना वैयक्तिकरित्या 22 डिसेंबर 2022 रोजीच्या ईमेलद्वारे कळविण्यात आले. पीसीबीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टिका करण्यात आली ती निराधार आहेत असे म्हणण्यात (Najam Sethi Targating Jay Shah ) आले.

Asian Cricket Council
नजम सेठी यांना चोख प्रत्यूत्तर

कोलंबो ( श्रीलंका ) : आशियाई क्रिकेट परिषदेने शुक्रवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांना चोख प्रत्यूत्तर दिले ( Asian Cricket Council Slam Najam Sethi ) आहे. एसीसी कॅलेंडर 2023-24 च्या घोषणेनंतर जय शाह यांच्यावर पीसीबी अध्यक्षांनी टिका केली(Najam Sethi Targating Jay Shah ) होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या टिका निराधार आहेत. त्या एसीसीद्वारे नाकारल्या जातात असे आशियाई क्रिकेट परिषदेने शुक्रवारी म्हटले आहे.

जय शाह यांची पोस्ट : “हा कार्यक्रम खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. क्रिकेटसाठी ही चांगली वेळ आहे. ACC ने दोन वर्षांच्या सामन्यात (२०२३-२०२४ दरम्यान) एकूण १४५ एकदिवसीय आणि टी२० सामने खेळले घोषित केले आहेत. 2023 मध्ये 75 आणि 2024 मध्ये 70 सामने खेळले जातील. या वर्षी जुलैमध्ये पुरुषांची ५० षटकांची स्पर्धा खेळवली जाईल. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये होईल. या वर्षी जूनमध्ये महिलांचा आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये असेल आणि त्यात आठ संघ सहभागी होतील.

आशिया चषक 2023 : आशिया चषक 2023 साठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एसीसीची रचना आणि "एकतर्फी" कॅलेंडर सादर केल्याबद्दल जय शाह यांच्यावर टीका केली होती. सेठी यांनी गुरुवारी शहा यांना व्यंग्यात्मक ट्विट करून उत्तर दिले आणि म्हणाले, एसीसी पाच आणि कॅलेंडर 2023-24 एकतर्फीपणे सादर केल्याबद्दल जय शाह यांचे आभार, विशेषतः आशिया कप 2023 शी संबंधित, ज्याचे आयोजन पाकिस्तान करत आहे. तुम्ही आमची PSL 2023 रचना आणि कॅलेंडर देखील सादर करू शकता ( PCB Chairman Najam Sethi ) असे पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले आहे.

योग्य प्रक्रियेचे पालन : आशियाई क्रिकेट परिषदेने अधिकृत निवेदन जारी केले आहे की, "गुरुवारी एसीसी कॅलेंडर 2023-24 आणि आराखड्याची रचना जाहीर केली आहे. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी ACC अध्यक्षांवर एकतर्फी टिप्पणी केल्याचे आमच्या निदर्शनास आली आहे. कॅलेंडरला अंतिम रूप देण्याचा निर्णय आणि त्याची घोषणा करण्यात येणार आहे. यातून एसीसीला हे स्पष्ट करायचे आहे की त्यांनी योग्य प्रक्रियेचे पालन केले आहे. या कॅलेंडरला 13 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत त्यांच्या विकास समिती आणि वित्त आणि विपणन समितीने मान्यता दिली आहे."

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टिका निराधार : "यानंतर कॅलेंडर सर्व सहभागी सदस्यांना वैयक्तिकरित्या 22 डिसेंबर 2022 रोजीच्या ईमेलद्वारे कळविण्यात आले. काही सदस्य मंडळांकडून प्रतिसाद मिळालेला असताना, पीसीबीकडून कोणत्याही टिप्पण्या किंवा सुचलेल्या सुधारणा प्राप्त झाल्या नाहीत. त्याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजम सेठींच्या टिका निराधार आहेत. त्या एसीसीद्वारे कठोरपणे नाकारल्या जातात," असे त्यांनी म्हटले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.