ETV Bharat / bharat

Shot To Youth : हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने झाडली तरुणावर गोळी; तरुणाचा मृत्यू - तरुणावर गोळीबार केल्याने खळबळ

बिहारच्या जेहनाबाद जिल्ह्यातील अनंतपूर गावाजवळ हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी तरुणावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात या तरुणाचा मृत्यू झाला.

ASI Shot To Youth
सुधीरकुमार
author img

By

Published : May 12, 2023, 3:01 PM IST

पाटणा : हेल्मेट न घातल्यामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षकाने तरुणावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली. या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिहारमधील जेहनाबाद परिसरात घडली आहे. सुधीर कुमार असे मृत तरुणाचे नाव असून तो मैमा कोरथू गावातील रहिवासी होता. तर मुमताज आलम असे गोळीबार करणाऱ्या सहायक उपनिरीक्षकाचे नाव आहे.

कशी घडली गोळीबाराची घटना : ओकरी पोलीस ठाणे हद्दीतील अनंतपूर गावाजवळ 28 मार्चला वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी सुधीर कुमार हा दुचाकीवरून बंधूगंज बाजारपेठेत जात होते. हेल्मेट नसल्यामुळे पोलिसांची तपासणी पाहून सुधीरकुमार हा घाबरला होता. पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने तो तेथून दुचाकीसह पळू लागला. त्याचवेळी ओकरी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक मुमताज आलमने या सुधीरकुमारवर मागून गोळीबार केला. गोळी झाडल्यानंतरही सुधीरकुमार हा दुचाकी चालवत राहिल्यानंतर काही अंतरावर तो रस्त्याच्या कडेला कोसळला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुधीरकुमारने घेतला अखेरचा श्वास : सुधीरकुमारवर गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला हिलसा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी त्याला चांगल्या उपचारासाठी पाटणा येथे रेफर केले. तिथे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. घटनेच्या ४६ दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 28 मार्चच्या घटनेनंतर जेहानाबादचे पोलीस अधीक्षक दीपक रंजन यांनी ओकरी पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रमुख चंद्रहास सिंह, आरोपी मुमताज आलम याच्यासह एकूण 5 जणांना निलंबित केले होते. गोळी झाडणाऱ्या मुमताज आलमला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले असून तो अजूनही तुरुंगातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी : सुधीरकुमारच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबीयांनी धाय मोकलून टाहो फोडला. आरोपीला नोकरीवरून बडतर्फ करुन पोलीस ठाणे प्रमुखांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

हेही वाचा -

1) Adani Hindenburg Dispute : अदाणी हिंडेबर्ग वाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार फैसला ?

2) Tihar Jail : कॅमेऱ्यासमोरच माफियाचा खून झाल्यानंतर प्रशासनाला आली जाग; तिहार कारागृहातील 99 अधिकाऱ्यांची उचलबांगडी

3) Imran Khan Set To Appear In IHC : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान होणार इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.