ETV Bharat / bharat

International Film Festival : अडीच इंची मोबाईल स्क्रीन कलाकृतीला न्याय देऊ शकत नाही - अशोककुमार चटोपाध्यय - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

17व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( International Film Festival ) डॉक्यूमेंट्री या प्रकारात काही बंगाली फिल्म दाखवण्यात आल्या. यात थोर माईम आर्टिस्ट जोगेश दत्ता ( Jogesh Dutta Documentary ) यांच्या जीवनावर आधारित असलेली एक डॉक्युमेंटरी देखील दाखवण्यात आली. त्यांच्या जीवनावर आधारित असलेली 'an ode to quietude' या डॉक्युमेंटरीचे निर्माते अशोक कुमार चटोपाध्याय ( Ashoke Kumar Chattopadhyay Talk To ETV Bharat ) यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.

International Film Festival
International Film Festival
author img

By

Published : Jun 2, 2022, 4:11 PM IST

Updated : Jun 2, 2022, 5:30 PM IST

मुंबई - 17व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( International Film Festival ) डॉक्यूमेंट्री या प्रकारात काही बंगाली फिल्म दाखवण्यात आल्या. यात थोर माईम आर्टिस्ट जोगेश दत्ता ( Jogesh Dutta Documentary ) यांच्या जीवनावर आधारित असलेली एक डॉक्युमेंटरी देखील दाखवण्यात आली. जोगेश दत्ता हे एक बंगाली कलाकार होते. त्यांनी आपल्या देशात माईम हा कलाप्रकार रुजवला व तो जगभर पोहोचवला. त्यांच्या जीवनावर आधारित असलेली 'an ode to quietude' या डॉक्युमेंटरीचे निर्माते अशोक कुमार चटोपाध्याय ( Kumar Chattopadhyay Talk To ETV Bharat ) यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.

प्रतिक्रिया

जोगेश दत्ता यांची जीवन कहाणी - अशोक कुमार चटोपाध्यय म्हणाले की, "मी जी डॉक्युमेंट्री बनवलेय ती आपल्या देशातले महान माईम आर्टिस्ट ज्यांनी मुकाभिनय हा प्रकार संपूर्ण जगभर पोचवला, माईम या प्रकाराला ज्यांनी आपल्या देशात रुजवलं असे महान अभिनेते जोगेश दत्ता यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांना ट्रिब्युट देण्यासाठी डॉक्युमेंटरी बनवले आहे. यात मी त्यांच्या बालपणापासून ते आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या, या प्रकाराविषयी त्यांची तळमळ हेच मी यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे."

माईम कला विकसित केली - ते म्हणाले, "जोगेश दत्ता यांनी वयाच्या 13-14 वर्षीच आई-वडील गमावले. स्वातंत्र्याच्या पहाटे, तो सियालदह स्टेशनवर पूर्व पाकिस्तानातील एक गरीब निर्वासित म्हणून दिसले. हॉटेल, चहाची टपरी अनेक ठिकाणी यांनी कामं केली. याच अनुभवातून आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी इतरांचे मिमिक्री करण्याचे कौशल्य विकसित केले. त्यांची विनोदबुद्धीही अप्रतिम होती. हळुहळू त्यांनी स्वतःच्या बळावर माईम कला विकसित केली."

मोबाईल स्क्रीन कलाकृतीला न्याय देऊ शकत नाही - अशोक कुमार चट्टोपाध्याय म्हणाले की, "मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रेझमुळे लोक स्टेजवरील कला प्रकार विसरत आहेत. पूर्वीप्रमाणे स्टेजवरील कला पाहण्यासाठी सभागृहात गर्दी व्हायची. अडीच इंची मोबाईल स्क्रीन कलाकृतीला न्याय देऊ शकत नाही. एखादं गाणं, संगीत किंवा नाटक बघायचं असेल तर प्रेक्षागृहात जावं लागेल. माईम हा एक शक्तिशाली कला प्रकार आहे. जो कोणताही शब्द न वापरता तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकतो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी माईमचा वापर क्रांतिकारकांनी निषेधाचे माध्यम म्हणून केला होता. सामाजिक प्रश्नांना समोर आणण्याइतकी ताकद अजूनही एक कलाप्रकारात आहे."

प्रवेश फी घेणं बंद करा - अशोक कुमार म्हणाले की, "डॉक्युमेंट्री या प्रकारात फार असा पैसा नाही. अनेक स्पॉन्सर यात पैसा लावण्यात नकार देतात. काही प्रोडक्शन हाऊसदेखील एखादी डॉक्युमेंटरी विकत घेताना त्याच्यावर फार कमी बोली लावतात. एखाद्या चित्रपट महोत्सवात या डॉक्युमेंटरी प्रकाराला मिळणार बक्षीसदेखील खूपच कमी असतं. त्यामुळे अशा चित्रपट महोत्सवांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये डॉक्युमेंट्री रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी प्रवेश फी घेतली जाते, ती बंद करण्यात यावी जेणेकरून डॉक्युमेंटरी निर्मात्यांचं कुठेतरी आर्थिक बचत होईल."

हेही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरणावर न्यायालयाचा मोठा निर्णय; आरोपीला फाशीची शिक्षा

Last Updated : Jun 2, 2022, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.