ETV Bharat / bharat

Ashes Holi Bihar : बिहारच्या 'या' गावातून झाली होळीची सुरुवात; राखेने खेळतात होळी - बिहार या गावातून होळीची सुरुवात

संपूर्ण भारतात होलिका दहनाची परंपरा आहे. ( Holi 2022 ) होलिका ही हिरण्यकशिपूची बहीण होती. तिला आपल्या भावाच्या सांगण्यावरून प्रल्हादला मारायचे होते. मात्र, ती स्वतः मरण पावली. तेव्हापासून होलिका दहन सुरू झाले. ( Holika Dahan ) ही कथा सर्वांनाच माहीत आहे. पण ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Ashes Holi Bihar
बिहारमध्ये राखेची होळी
author img

By

Published : Mar 16, 2022, 7:05 PM IST

पूर्णिया (बिहार) - संपूर्ण भारतात होलिका दहनाची परंपरा आहे. ( Holi 2022 ) होलिका ही हिरण्यकशिपूची बहीण होती. तिला आपल्या भावाच्या सांगण्यावरून प्रल्हादला मारायचे होते. मात्र, ती स्वतः मरण पावली. तेव्हापासून होलिका दहन सुरू झाले. ( Holika Dahan ) ही कथा सर्वांनाच माहीत आहे. पण ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून या उत्सवाची सुरुवात झाल्याचे मानले जाते.

बिहारमध्ये राखेची होळी

आजही होलिका दहनाशी संबंधित अवशेष बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील बनमंखी येथील सिकलीगड धरहरामध्ये शिल्लक आहेत. ( Holika Dahan Festival in Banmankhi ) जिथे भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी भगवान नरसिंहाने स्तंभातून अवतार घेतला आणि प्रल्हादचा उद्धार झाला. बनमंखी येथील होलिका दहन उत्सव हा राज्याचा सण म्हणून थाटामाटात साजरा केला जातो. याठिकाणी आजही लोक रंगांनी नव्हे तर राखेने होळी खेळतात.

हेही वाचा - कसा तयार होतो गुलाल? किती सुरक्षित? धुळवडीच्या आधी जाणून घ्या माहिती

भगवान नरसिंहाने येथे हिरण्यकशिपूचा केला वध -

नरसिंह अवताराच्या या मंदिराच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. दरवर्षी होलिका दहन येथे मोठ्या थाटामाटात होते आणि येथे होलिका दहन केल्यानंतरच दुसऱ्या ठिकाणी होलिका प्रज्वलित केली जाते. येथे तो स्तंभ आजही आहे, ज्याबद्दल असे मानले जाते की भगवान नरसिंहाने या दगडी स्तंभातून अवतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला होता. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 किमी अंतरावर बनमंखी येथील धरहरा गावात एक प्राचीन मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद या भक्ताच्या रक्षणासाठी भगवान नरसिंहाने येथील स्तंभातून अवतार घेतला होता. भगवान नरसिंहाच्या अवताराशी संबंधित स्तंभ (माणिक स्तंभ) आजही येथे आहे. अनेकवेळा तो तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो तुटला नाही, पण हा खांब वाकलेला होता. भगवान नरसिंहाच्या या सुंदर मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि शंकरासह 40 देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. याठिकाणी होळीच्या दिवशी लाखो लोकांची उपस्थिती असते.

हेही वाचा - Holika Dahan 2022 : पर्यावरण रक्षणासाठी होळी दहनात लाकडाला 'गो कास्ट'चा पर्याय

राख-मातीने खेळली जाते होळी -

सिकलीगड धरहराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे राख आणि मातीने होळी खेळली जाते. असे म्हणतात की जेव्हा होलिका दहन झाली आणि प्रल्हाद चितेतून सुखरूप परत आला तेव्हा लोकांनी एकमेकांवर राख आणि माती टाकून आनंद साजरा केला. तेव्हापासून होळीची सुरुवात झाली. स्थानिक लोकांनी सांगितले की, येथे होलीका दहनाच्या वेळी, लाखो लोक उपस्थित असतात. तसेच राख आणि मातीने होळी खेळतात. अनेक परदेशी याठिकाणी भेट देतात. तसेच अनेक चित्रपटांची शुटींगही याठिकाणी केली जाते.

येथील आमदार आणि बिहार सरकारचे माजी पर्यटनमंत्री कृष्ण कुमार ऋषि यांनी या स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. होळीच्या प्रसंगी राजकीय कार्यक्रम घोषित केला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे राजकीय कार्यक्रम झाला नाही. तर याबद्दल कला संस्कृती मंत्री आलोक रंजन म्हणाले आहेत की, यावेळी होळी सण राज्यस्तरीय कार्यक्रमात साजरा केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.