ETV Bharat / bharat

हृदयरोगींसाठी दिलासादायक बातमी..! आयआयटी कानपूरमध्ये कृत्रिम हृदय निर्मितीवर होतंय काम

हृदयरोगींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आयआयटी कानपूर या शैक्षणिक संस्थेने कृत्रिम हृदय तयार करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना देखील करण्यात आली आहे.

artificial heart iit kanpur
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jan 9, 2022, 8:15 PM IST

Updated : Jan 9, 2022, 9:07 PM IST

कानपूर (उ. प्र) - हृदयरोगींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आयआयटी कानपूर या शैक्षणिक संस्थेने कृत्रिम हृदय तयार करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना देखील करण्यात आली आहे. असे झाल्यास रुग्णांना हृदय प्रत्यारोपणासाठी वाट पाहावी लागणार नाही आणि उपचारावरील खर्च देखील कमी होणार आहे.

माहिती देताना आयआयटी कानपूरचे प्राध्यापक अमिताभ बंदोपाध्याय

हेही वाचा - कोरोना ओमायक्रॉनपेक्षा कमी घातक असल्याचे कोणतेही कारण उपलब्ध नाही - तज्ञ

या पथकामध्ये आईआईटीच्या प्राध्यापकांव्यतिरिक्त यूएसचे अनेक तज्ज्ञ, एम्स, अपोलो, फोर्टिस आणि मेदांताच्या वरिष्ठ तज्ज्ञांचा समावेश आहे. हे पथक कृत्रिम हृदयाला डिव्हाईसच्या स्वरुपात विकसित करण्यात गुंतले आहे. लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्ट डिव्हाईस ( LVAD ) असे या डिव्हाईसचे नाव ठेवण्यात आले आहे.

अशी सुचली कल्पना

आईआईटी कानपूरचे प्राध्यापक अमिताभ बंदोपाध्याय यांनी सांगितले की, आईआईटी कानपूरच्या वैद्यकीय यशाबाबत एक बैठक सुरू होती. यात संस्थेने कोरोना काळात कमी किमतीत व्हेंटिलेटर आणि चांगले कॉन्सन्ट्रेटर्स तयार करून जगात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे व्यक्त करण्यात आले. यावेळी एकाने आपण कृत्रिम हृदय का तयार करत नाही? असा प्रश्न केला. बस, संस्थेने त्याचवेळी या कल्पनेला आव्हान म्हणून स्विकार केले. कृत्रिम हृदय बनवण्यासाठी तात्काळ टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.

बाजारात येण्यासाठी लागू शकतात 5 वर्षे

प्राध्यापक अमिताभ बंदोपाध्यायनुसार, जेव्हाही एखादा वैद्यकीय डिव्हाईस तयार केला जातो तेव्हा त्याची अनेक टप्प्यांत चाचणी केली जाते. हा डिव्हाईस तयार व्हायला दोन वर्षे लागतील. त्यानंतर प्राण्यांवर त्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर क्लिनिकल चाचणी होईल. हा डिव्हाईस बाजारात येण्यासाठी जवळपास पाच वर्षांचा कालावधी लागेल.

काय आहे कृत्रिम हृदय?

कृत्रिम हृदय म्हणजे, लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्ट डिव्हाईस ( LVAD ) एक असा पंप आहे ज्याचा उपयोग अशा हृदयरोगींसाठी केला जातो ज्यांचे हृदय पूर्णत: फेल झालेले आहे आणि तो रुग्ण शेवटच्या स्टेजवर आहे. हे चुंबकीय आधारावर हृदयाप्रमाणे काम करते. या डिव्हाईसमध्ये 8 रिचार्जेबल बॅटरी असतात. याची बॅटरी 12 तासांपर्यंत चालू शकते. आता देशात ज्या कृत्रिम हृदयाचे प्रत्यारोपण होते तो विदेशातून येतो आणि त्याची किंमत खूप अधिक असते. जेव्हा आईआईटी कानपूर या डिव्हाईसला तयार करेल तेव्हा ते खूप स्वस्त होईल. सामान्य माणसांना ते सहज उपलब्ध होऊ शकेल.

काय आहे हृदय प्रत्यारोपण?

हृदय प्रत्यारोपण एक शल्य प्रक्रिया ( Surgical Procedure ) आहे ज्यात एका रोगग्रस्त हृदयाच्या जागी सामान्य दात्याचे ( Donor ) हदय लावले जाते. डोनरच्या हार्टचे साईज आणि ब्लड ग्रुप प्राप्तकर्त्याच्या शरीराच्या अनुकूल असले पाहिजे.

हृदय प्रत्यारोपण कधी केले जाते?

हार्ट फेल्यूअर हे हृदय प्रत्यारोपणाचे सामान्य कारण आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात हृदय शरीराच्या गरजेनुसार रक्त पंप करण्यास सक्षम राहात नाही. सुरुवातीला हार्ट फेल्यूअरवर इटियोलॉजी, सॉल्ट रिस्ट्रिक्शन, फ्लुड रिस्ट्रिक्शन आणि औषधींच्या माध्यमातून उपचार केल्या जाते. काही प्रकरणांमध्ये विशिष्ठ पेस मेकर लावले जाते. शेवटचा पर्याय हा प्रत्यारोपण मानला जातो.

देशात दरवर्षी 60 ते 70 हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज

जगात दरवर्षी 5 हजार हृदय प्रत्यारोपण होतात. अमेरिकेत दरवर्षी 2 हजार 500 प्रत्यारोपण होतात. तर, भारतात चार वर्षांपूर्वीपर्यंत जवळजवळ 70 प्रत्यारोपणच होत होते. एका अंदाजानुसार, देशात दरवर्षी 60 ते 70 हजार हृदय प्रत्यारोपणाची गरज असते.

इतका येतो खर्च

दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणासाठी एक लाख रुपयांचा खर्च येतो. तेच खासगी रुग्णालयांमध्ये 15 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो.

हेही वाचा - Traffic Related Pollution : वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे दोन कोटी मुलांना अस्थमाचा धोका - लॅन्सेट

Last Updated : Jan 9, 2022, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.