ETV Bharat / bharat

12 More Cheetahs To KNP : कुनोमध्ये फेब्रुवारीत येणार आणखी १२ चित्ते, भारत दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार

मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले आहेत. आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 12 चित्ते देण्याबाबातचा साम्यंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी फेब्रुवारीच्या मध्यात भारतात आणखी 12 चित्ते आणण्यात येणार आहेत. हे चित्तेसुद्धा कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात येणार आहेत.

author img

By

Published : Jan 27, 2023, 7:23 PM IST

12 More Cheetahs To KNP
संग्रहित छायाचित्र

भोपाळ - भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 12 चित्ते देण्यासाठी साम्यंजस्य करार करण्यात आला आहे. त्या करारानुसार मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात फेब्रुवारी महिन्यात 12 चित्ते येणार आहेत. मागील आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत याबाबतचा करार झाला आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी नामिबियातून भारताने 8 चित्ते आणले आहेत. ते देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत. नवी दिल्ली आणि प्रिटोरिया या दक्षिण आफ्रिकेच्या राजधानीत हा साम्यंजस्य करार करण्यात आला आहे.

12 More Cheetahs To KNP
संग्रहित छायाचित्र

एका चित्त्यासाठी 3 हजार डॉलर : चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यासाठी भारत दक्षिण आफ्रिकेला 3 हजार अमेरिकन डॉलर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्यांना दहा दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी 10 विलगीकरण बोमा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. साम्यंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे चित्ते येणास उशीर झाल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.

आरोग्याबाबत चिंता : दक्षिण आफ्रिकेतून हे चित्ते भारतात येणार असल्याने त्यांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 15 जुलैपासून हे चित्ते वेगळे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्ते दिर्घकाळ विलगीकरणात राहिल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हे चित्ते त्यांचे फिटनेस गमावण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतात आणण्यात येणाऱ्या चित्त्यांपैकी सात नर तर पाच मादी असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महिन्यापासून शिकार बंद : भारतात आणण्यात येणाऱ्या या १२ चित्त्यांपैकी ३ चित्त्यांना १५ जुलैपासून आफ्रिकेतील क्वाझुलु-नताल प्रांतातील फिंडा विलगीकरण बोमा आणि लिम्पोपो प्रांतातील रॉइबर्ग येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात त्यांनी एकदाही शिकार केली नाही. त्यामुळे त्यांचे फिटनेस बर्‍याच प्रमाणात कमी झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका शिष्टमंडळाने सप्टेंबरच्या सुरुवातीला कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी चित्ते राहण्यासाठी वन्यजीव अभयारण्यातील व्यवस्था पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबरला त्यांच्या 72 व्या वाढदिवशी नामिबियातून कुनो राष्ट्रीय उद्यानात 8 चित्ते आणली आहेत.

एक महिना विलगीकरणात : भारताला नामिबियातून आठ आणि दक्षिण आफ्रिकेतून 12 चिते आयात करायचे होते. मात्र योजना पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकली नाही. दुसरीकडे भारतीय वन्यजीव कायद्यांनुसार प्राणी आयात करण्यापूर्वी एक महिन्यासाठी विलगीकरणात ठेवणे अनिवार्य आहे. त्यामुळे हे 12 चित्ते देशात आल्यानंतर पुढील 30 दिवस विलगीकरणात ठेवावे लागणार आहे. भारतातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मृत झाला होता. त्यानंतर 1952 मध्ये चित्त्यांची प्रजाती नामशेष झाल्याचे बारताने घोषित केले आहे. मात्र आता भारताने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आयात केल्याने भारतात पुन्हा चित्त्यांचे वास्तव्य दिसणार आहे.

हेही वाचा : Raja Chari Indian American Astronaut : भारतीय वंशाचे अंतराळवीर राजा चारी अमेरिकन हवाई दलाचे ब्रिगेडीयर जनरल म्हणून नामांकीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.