नवी दिल्ली - एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची प्रतिक्षा संपली आहे. आजपासून किरकोळ गुंतवणूकदार देशातील सर्वात मोठ्या एलआयसी आयपीओसाठी अर्ज करु शकणार आहेत. ( Today apply for the LIC IPO ) एलआयसीचा आयपीओ (4 मे 9 मे)या कालावधीत सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला आहे. या कालावधी दरम्यान गुंतवणुकदार या आयपीओमध्ये गुंतवणूक करु शकतील.
-
LIC IPO to open on May 4
— ANI Digital (@ani_digital) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/zDDDDmyHog#LICIPO #LIC #IPO #LICIPOlaunch pic.twitter.com/oyhvBuiyHM
">LIC IPO to open on May 4
— ANI Digital (@ani_digital) April 25, 2022
Read @ANI Story | https://t.co/zDDDDmyHog#LICIPO #LIC #IPO #LICIPOlaunch pic.twitter.com/oyhvBuiyHMLIC IPO to open on May 4
— ANI Digital (@ani_digital) April 25, 2022
Read @ANI Story | https://t.co/zDDDDmyHog#LICIPO #LIC #IPO #LICIPOlaunch pic.twitter.com/oyhvBuiyHM
भारताताली विमा उद्योगाचा विकासदर 17 टक्के, एलआयसीचा विकासदर 7 टक्के आहे. मात्र, अनाधिरकृत बाजारात त्याचा प्रिमियम 85 रुपये आहे. म्हणजेच 949 रुपयांचा शेअर, 1,034 रुपयांवर व्यापार करत आहे. ( Today LIC IPO Is Open) अनेक बाजार विश्लेषकांनी या आयपीओला 'भरणा करण्यायोग्य' अर्थात 'सबस्क्राइब' असा दर्जा दिला आहे. तरीही अनेक बाजार विश्लेषक एलआयसीच्या उणिवांकडे बोट दाखवून गुंतवणूकदारांना सावधही करताना दिसत आहे.
डिजिटल अस्तित्व कमी - एलआयसीचे अस्तित्व डिजिटल मंचावर फारसे दिसत नाही. आजही एलआयसीच्या पॉलिसी अधिकांश प्रतिनिधींच्या मार्फतच विकल्या जातात. (Applications for LIC IPO) एलआयसीने सेबीकडे दिलेल्या कागदपत्रांनुसार एकूण वैयक्तिक प्रीमियमच्या केवळ ३६ टक्के प्रीमियम डिजिटल मंचावरून जमा केला जातो आहे. या तुलनेत खासगी विमा कंपन्यांचा ९० टक्के प्रीमियम डिजिटल माध्यमातून जमा होतो. एलआयसीकडे अशाच पद्धतीने प्रीमियम जमा होत राहिला तर कंपनीचा खर्च वाढत जाणार आहे.
बाजारहिश्शाचा प्रश्न - एलआयसीचे नव्या व्यवसायाचे मार्जिन मूल्य खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या मानाने कमी आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत एलआयसीचे नव्या व्यवसायाचे मार्जिन मूल्य ९.९ टक्के होते. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, बजाज अलियान्झ लाइफ व मॅक्स लाइफ यांच्या नव्या व्यवसायाचे मार्जिन ११ ते २७ टक्के आहे.
एकूण आयुर्विमा क्षेत्रात एलआयसीचा बाजार हिस्सा ६४ टक्के आहे. परंतु हा बाजारहिस्सा दिवसेंदिवस कमी होत जातो आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०२०-२१ या काळात एलआयसीची वाढ वार्षिक ९ टक्के दराने झाली. मात्र त्याचवेळी खासगी विमा कंपन्यांची वाढ वार्षिक १८ टक्के दराने झाली.
हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट, उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण