ETV Bharat / bharat

Apple Alert Phone Hacking : फोन हॅकिंगचे प्रयत्न सुरू... महुआ मोईत्रा यांच्यापाठोपाठ राहुल गांधींचे मोदी सरकारवर गंभीर आरोप - cash for query case

Apple Alert Phone Hacking : तृणमुल काँग्रेसच्या खासदार यांनी फोन हॅकिंग प्रकरणात केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. फोन हॅक केल्याचा आरोप करत खासदार महुआ यांनी अॅपलकडून अलर्ट मिळाल्याचा दावा केला. अॅपलकडून तसा संदेश आल्याचा दावा ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी व शशी थरुर आणि इंडिया आघाडीच्या काही नेत्यांना आल्याचा दावा करण्यात आला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही फोन हॅकिंगवरून केंद्र सरकारवर टीका केली.

Apple Alert Phone Hacking
Apple Alert Phone Hacking
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 1:30 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून फोन हॅकिंग होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून मोबाईल आणि ई-मेल हॅक झाल्याचा आरोप तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अॅपल कंपनीकडून मला अलर्ट मिळाला आहे. भारत सरकारकडून माझा फोन आणि ई-मेल आयडी हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • महुआ मोइत्रा यांनी गृहमंत्रालयाला एक्स सोशल मीडियात टॅग करत गंभीर आरोप केला. महुआ यांनी म्हटलं की, अदानी आणि पंतप्रधान कार्यालयाच्या लोकाकडून मला धमकाविण्याचा आणि घाबरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला त्यांची दया येत आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) आणि इंडियाच्या काही नेत्यांना अॅपल कंपनीकडून अलर्ट मिळाले आहेत.
    • Received text & email from Apple warning me Govt trying to hack into my phone & email. @HMOIndia - get a life. Adani & PMO bullies - your fear makes me pity you. @priyankac19 - you, I , & 3 other INDIAns have got it so far . pic.twitter.com/2dPgv14xC0

      — Mahua Moitra (@MahuaMoitra) October 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनादेखील मोबाईलवर अलर्ट आला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांनी म्हटलं की, माझ्यासारख्या करदात्यांच्या पैशातून काही कमी रोजगार असलेल्या अधिकाऱ्यांना कामात व्यस्त ठेवण्यात येत असल्यानं आनंद आहे. त्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचं करण्यासारखं काम नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित होत आहे.

  • #WATCH | Delhi: On multiple opposition leaders allege 'hacking' of their Apple devices, Congress MP Rahul Gandhi says "...Very few people are fighting against this but we are not scared. You can do as much (phone) tapping as you want, I don't care. If you want to take my phone, I… pic.twitter.com/ioUowf4Pe8

    — ANI (@ANI) October 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वैयक्तिक गोपनीय कायद्याचे उल्लंघन- महुआ मोइत्रा यांच्या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, प्रिय मोदी सरकार, तुम्ही असे का करत आहात? समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह म्हणाले की अॅपल कंपनीकडून अखिलेश यादव यांनादेखील अलर्ट आला. हे वैयक्तिक गोपनीय कायद्याचे उल्लंघन आहे. खासदार असुद्दीन ओवैसी यांनादेखील अॅपल कंपनीचा अलर्ट आला.

पैशाच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याचा आहे आरोप- गेल्या काही दिवसांपासून खासदार मोईत्रा या कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडचणीत सापडल्या आहेत. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी खासदार मोईत्रा यांनी उद्योगपतीकडून पैसे घेतल्याचा भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला. मोईत्रा यांनी उद्योगपतीला संसदेकडून देण्यात येणारे युझरनेम पासवर्डही दिल्याचा दावा खासदार दुबे यांनी केला होता.

हेही वाचा-

  1. Case against Union Minister Rajeev Chandrasekhar : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर केरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.