ETV Bharat / bharat

Cow Hug Day : 'काऊ हग डे'चे आवाहन अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने घेतले मागे; वाचा कुठे माशी शिंकली - Animal Welfare Board withdraws

अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने 14 फेब्रुवारी हा 'काऊ हग डे' साजरा करण्याचे आवाहन मागे घेतले आहे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाने (AWBI) शुक्रवारी सांगितले की, त्यांनी 14 फेब्रुवारी साजरा करण्याचे आवाहन मागे घेतले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना सरकारच्या निर्देशानुसार 'काउ हग डे' साजरे करण्याचे आवाहन केले होते, ते आता सरकारने मागे घेतले आहे.

Animal Welfare Board withdraws appeal to celebrate Feb 14 as 'Cow Hug Day'
'काऊ हग डे'चे आवाहन अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने घेतले मागे; पाहूया काय आहे नेमके कारण
author img

By

Published : Feb 10, 2023, 7:26 PM IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ. एस.के. दत्ता यांनी एक पत्र काढून १४ फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी 14 फेब्रुवारीला 'काउ हग डे' म्हणून साजरा करण्याच्या बोर्डाने दिलेल्या आवाहनाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ते चांगले होईल, असे सांगितल्यानंतर लगेचच अपील मागे घेण्यात आले आहे. कारण यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर सरकारने केलेले आवाहन मागे घेण्यात आले आहे.

  • Animal Welfare Board of India withdraws appeal to celebrate February 14 as 'Cow Hug Day'

    — Press Trust of India (@PTI_News) February 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मंत्रालयाचे सचिव यांनी काय म्हटले पत्रात : या पत्रात दत्ता यांनी म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते,’ असे या पत्रात म्हणण्यात आले होते. त्यामुळे भारतीय नागरिकांनी गायीला मिठी मारून प्रेम दिवस साजरा करावा, जी आपल्या सगळ्यांचे पोषण करते. त्यामुळे आपण प्रेम दिवस गायीला मिठी मारून करावा. भारतात प्रेमदिनाला कायमच विरोध होतो. हा विरोध आता सरकारच्या पातळीवरदेखील होत आहे.

'गो आलिंगन दिन' साजरा करण्याचे आवाहन : १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. 'सक्षम प्राधिकरण आणि मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी 2023 रोजी 'गो आलिंगन दिन' साजरा करण्यासाठी जारी केलेले अपील मागे घेण्यात आले आहे.' असे बोर्डाचे सचिव एस. के. दत्ता यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. त्याच्या वेबसाइटवर पोस्ट केले आहे.

AWBI ने पहिल्यांदाच देशातील प्रथमच केले आवाहन : AWBI ने पहिल्यांदाच देशातील गोप्रेमींना 'काउ हग डे' साजरा करण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी, मंडळाने म्हटले होते की, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ लुप्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळे हे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला म्हणाले होते की, AWBI ने 14 फेब्रुवारीला 'काउ हग डे' म्हणून साजरा करण्याच्या आवाहनाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर चांगले होईल. रुपाला यांनी सांगितले होते की, यासाठी १४ फेब्रुवारीची तारीख निवडण्यात फारसा वाचू नये.

या देशाला गायीची पूजा करण्याची जुनी परंपरा : 'या देशाला गायीची पूजा करण्याची जुनी परंपरा आहे आणि लोकांनी गायीला आलिंगन दिले ही खूप आनंदाची बाब आहे, जर लोकांनी आमच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर चांगले आहे,' असे मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस असल्याने त्या दिवशी लोकांनी गायीचे स्मरण करून प्रेम केले तर चांगलेच आहे. जर कोणी यावर टोमणा मारला तर एखाद्याला राग येऊ नये तर दया वाटली पाहिजे' असेही त्यांनी सांगितले. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 च्या कलम 4 अंतर्गत 1962 मध्ये स्थापन करण्यात आलेले मंडळ, प्राणी कल्याण संस्थांना अनुदान देते आणि केंद्राला प्राणी कल्याण समस्यांवर सल्ला देते. ही प्राणी कल्याण कायद्यांवरील वैधानिक सल्लागार संस्था आहे आणि देशातील प्राणी कल्याणाला प्रोत्साहन देते.

हेही वाचा : Congress MP Rajani Patil Suspended: काँग्रेस खासदार रजनी पाटलांचं राज्यसभेतून निलंबन.. म्हणाल्या, 'भाजपने माझा अवमान केला..'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.