विशाखापट्टणम Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात रविवारी रात्री दोन रेल्वेंचा भीषण अपघात झालाय. हा अपघात मानवी चुकांमुळं झाल्याची शक्यता ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ बिस्वजित साहू व्यक्त केलीय. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 लोक जखमी झाले आहेत.
-
#WATCH | Drone visuals of the train collision in Vizianagaram, Andhra Pradesh. Rescue operations underway pic.twitter.com/ou24l03HP1
— ANI (@ANI) October 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Drone visuals of the train collision in Vizianagaram, Andhra Pradesh. Rescue operations underway pic.twitter.com/ou24l03HP1
— ANI (@ANI) October 30, 2023#WATCH | Drone visuals of the train collision in Vizianagaram, Andhra Pradesh. Rescue operations underway pic.twitter.com/ou24l03HP1
— ANI (@ANI) October 30, 2023
प्रशासन काय म्हणाले : ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ विश्वजित साहू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेननं सिग्नल ओव्हरशूट केल्यानं हा अपघात होऊ शकतो. सिग्नल ओव्हरशूटिंग या शब्दाचं स्पष्टीकरण देताना, सीपीआरओ म्हणाले की जेव्हा एखादी ट्रेन लाल सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढे जाते तेव्हा असं घडतं. यामुळं हा अपघात मानवी चुकांमुळं घडल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
- मृतांचा आकडा 14 वर : या अपघातात भीषण अपघातात आतापर्यंत 14 जण ठार तर सुमारे 100 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. अजूनही बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघात कसा झाला : आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यातील अलमांडा-कंकटापल्लीजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास एका पॅसेंजर ट्रेनची दुसर्या पॅसेंजर ट्रेनला धडक बसली होती. विझियानगरम ते रायगड या प्रवाशांसह प्रवास करणाऱ्या रेल्वेनं त्याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या विशाखापट्टणम ते पलासा या पॅसेंजर ट्रेनला धडक दिली होती. यामुळं रेल्वेचे चार डबे रुळावरून घसरुन मोठा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
पंतप्रधान, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त : आंध्र प्रदेशातील या रेल्वे अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेकांनी या अपघातावर दुःख व्यक्त केलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून दोन लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली. आंध्र प्रदेश सरकारनंही मृतांच्या वारसांना तसंच जखमींना मदत जाहीर केलीय.
हेही वाचा :
- Fire Breaks in Pathankot Express : 'त्या' रेल्वे कर्मचाऱ्यामुळे पठाणकोट एक्सप्रेसमधील आगीची मोठी दुर्घटना टळली, जाणून घ्या सविस्तर
- Ahmedabad Howrah Express : नांदुरा रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक; पाहा व्हिडिओ
- Bihar Train Accident : 'अचानक धक्का बसला अन्...', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती, आतापर्यंत ४ ठार