ETV Bharat / bharat

Amritpal Singh Wife : अमृतपाल सिंगच्या पत्नीने सोडले मौन, केला हा मोठा खुलासा.. - किरणदीप कौर

अमृतपाल सिंग फरार झाल्यानंतर आता त्याच्या एनआरआय पत्नी किरणदीप कौरने एका माध्यमाला मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की, 'अमृतपाल केवळ धर्माचा प्रचार करतो आहे. असे करणे काही गुन्हा ठरत नाही'.

Amritpal Singh Wife Kirandeep Kaur
अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर
author img

By

Published : Mar 29, 2023, 9:47 AM IST

चंदीगड : 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग 18 मार्चपासून फरार आहे. पंजाब पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत आहेत. आता अमृतपाल सिंगची एनआरआय पत्नी किरणदीप कौर उघडपणे मीडिया समोर आली आहे. किरणदीप कौरने एका खासगी मासिकाशी संवाद साधताना सांगितले की, मी अमृतपाल सिंग याच्यासोबत वारिस पंजाब दे संघटनेबद्दल फारसे बोलले नाही. तो नेहमी त्याच्या धार्मिक उपदेशात व्यस्त असायचा. किरणदीप कौर म्हणाल्या की, अमृतपालने कोणतेही चुकीचे काम केले नाही. त्याची पहिली प्राथमिकता शीख धर्म आणि दुसरी प्राथमिकता मी असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृतपालशी ओळख कशी झाली? : अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर पुढे बोलताना म्हणाली की, धर्माचा प्रचार करणे चुकीचे नाही. मात्र त्यासाठी अमृतपालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय किरणदीप कौर अमृतपाल सिंगसोबतची मैत्री आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलली. ती म्हणाली की, आमची मैत्री इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली. अमृतपाल याच्या विचारांनी मी प्रभावित झाले. मला समजले की ती व्यक्ती मानवतेसाठी आणि धर्मासाठी काम करते आहे. त्यानंतर हे नाते मैत्रीतून लग्नात बदलले, असे ती म्हणाली.

अमृतपाल सिंग कुठे आहे? : या प्रश्नावर बोलताना किरणदीप कौर म्हणाली की, 18 मार्चनंतर त्याच्याशी कधीच संभाषण झाले नाही. मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांवरून अमृतपाल सिंग कुठे आणि कसा हे सांगितले जात आहे. ती म्हणाली की, 18 मार्चपासून अमृतपाल सिंग याचे कुटुंबीय चिंतेत आहेत की त्यांचा मुलगा कुठे गेला आहे. ती म्हणाली की, अमृतपाल सिंग याने नेहमीच शीख धर्म आणि अधिकारांचाच प्रचार केला आहे.

अमृतपालने पंजाबमध्ये काय चूक केली? : अमृतपाल सिंगमुळे पंजाबमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल बोलताना किरणदीप कौर म्हणाली की, अमृतपाल सिंग याने नेहमीच पंजाब आणि शीख धर्मासाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे त्याने काहीही चूक केलेली नाही, तो निर्दोष आहे. ती म्हणाली की, धर्माचा प्रचार करण्यात काहीच गैर नाही. अमृतपाल सिंग याने पंजाबमधील तरुणांना ड्रग्जपासून दूर राहून राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्याला खोट्या आरोपात अडकवले जात आहे.

किरणदीप कौर यूकेला परतणार का? : पंजाबमधील परिस्थितीमुळे यूकेला परत जाण्याबाबत किरणदीप कौर म्हणाली की, ती कोणत्याही परिस्थितीतून पळून जाणार नाही. ती म्हणाली की, आमच्यावर ब्रिटनमधील बब्बर खालसाशी संबंध असल्याचा आरोपही केला जात आहे. ती म्हणाली की, मी पंजाबमध्ये कायदेशीररित्या राहत आहे. मला युके सोडून जवळपास 2 महिने झाले आहेत. आता हेच माझे घर आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? : 'वारिस पंजाब दे' चा प्रमुख अमृतपाल सिंग याच्यावर 18 मार्च रोजी पंजाब पोलिस आणि निमलष्करी दलाने विविध आरोपांवर कारवाई केली होती. त्यानंतर अमृतपाल सिंग फरार आहे. अमृतपाल सिंग पंजाबमधून दिल्ली आणि दिल्लीहून नेपाळला पळून गेला असल्याच्या बातम्या मीडियात आल्या आहेत. याशिवाय अमृतपाल सिंगचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : Amritpal in Punjab : गेला अमृतपाल कुणीकडे, पंजाब पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरुच..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.