मुंबई - बॉलिवूड शहंशहा अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. हा दिवस अमिताभ यांचे फॅन्स मोठ्या उत्सहात साजरा करतात. आज सकाळी जलसा या बंगल्यासमोर फॅन्सने मोठी गर्दी केली होती. अमिताभ यांनीही बंगल्याबाहेर येऊन फॅन्सला धन्यवाद दिले. पण अमिताभ यांचा यंदाचा वाढदिवस जरा खास आहे. त्यांनी या खास दिवशी अमिताभ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 'कमला पसंद'सोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ब्लॉगवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगवर त्यांच्या ऑफिसच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात सांगण्यात आले आहे, की कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला. गेल्या आठवड्यात करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अमिताभ बच्चन या ब्रँडशी संबंधित होते, तेव्हा ही जाहिरात सरोगेट जाहिरांतीअंतर्गत येत असल्याची त्यांना त्यांना माहिती नव्हती. अमिताभ यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. प्रमोशन फीदेखील परत केली आहे.
सरोगेट जाहिरात म्हणजे काय
तुम्ही टीव्हीवर मद्य, तंबाखू किंवा अशा पदार्थांच्या जाहिराती बघितल्या असतील, ज्यात त्यांच्यासंदर्भात थेट न सांगता एखादा दुसरा पदार्थ किंवा अगदी वेगळ्या पदार्थांच्या स्वरुपात दाखवले असेल. उदाहरण बघायचे झाले तर मद्याची जाहिरात सोडा किंवा कोल्डड्रिंक याच्याशी निगडित दाखवली जाते. म्हणजे अशी जाहिरात ज्यात दाखवलेले प्रोडक्ट वेगळे असले आणि मुळात जाहिरात करण्यात आलेले प्रोडक्ट वेगळे असते.
हेही वाचा - HBD Big B : ऐंशीच्या उंबरठ्यावरील अमिताभ म्हणतात, 'साठा तो पाठा, अस्सी तो लस्सी..!!'