ETV Bharat / bharat

Big B Watch RRR at rishikesh : अमिताभ बच्चन यांनी ऋषीकेश येथे पाहिला RRR चित्रपट - Amitabh Bachchan stayed at Ananda Hotel

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या 'गुड बाय' चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहेत. बुधवारी रात्री अमिताभ बच्चन साऊथचा सुपरहिट चित्रपट RRR पाहण्यासाठी ऋषिकेशच्या रामा पॅलेसमध्ये पोहोचले. तब्बल 47 वर्षांनंतर अमिताभ बच्चन ऋषिकेशला शूट करत आहेत.

Big B Watch RRR at rishikesh
Big B Watch RRR at rishikesh
author img

By

Published : Mar 31, 2022, 12:20 PM IST

ऋषिकेश : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या 'गुड बाय' चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण हरिद्वार आणि ऋषिकेश येथील विविध ठिकाणी सुरू आहे. बुधवारी रात्री अमिताभ बच्चन साऊथचा सुपरहिट चित्रपट RRR पाहण्यासाठी ऋषिकेशच्या रामा पॅलेसमध्ये पोहोचले. अमिताभ बच्चन रामा पॅलेसमध्ये पोहोचल्यावर थिएटरचे मालक अशोक गोयल आणि त्यांचा मुलगा हिमांशू गोयल यांनी त्यांचे स्वागत केले.

ऋषीकेश येथे पाहिला RRR चित्रपट

अमिताभ बच्चन अत्यंत गुपचूप चित्रपट पाहण्यासाठी रामा पॅलेसमध्ये पोहोचले होते. चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन नरेंद्रनगर येथील आनंदा हॉटेलकडे रवाना झाले. मात्र, यावेळी रामा पॅलेसभोवती त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर दिसत होता.

अमिताभ बच्चन शूटिंगसाठी ऋषीकेशमध्ये

अमिताभ बच्चन टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगर येथील आनंदा हॉटेलमध्ये थांबले आहेत. आनंदा हॉटेल आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे व्हीव्हीआयपींमध्ये प्रसिध्द आहे. येथील उंच टेकड्यांवरून ऋषिकेशचे विहंगम दृश्य दिसते. तब्बल 47 वर्षांनंतर अमिताभ बच्चन ऋषिकेशला लोकेशन्सवर शूट करण्यासाठी आले आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवर दोन फोटो शेअर केले होते. फोटोमध्ये अमिताभ बच्चन गंगेत बोटीवर आहेत आणि मागून ऋषिकेशचे दृश्य दिसत आहे. 'गुड बाय' चित्रपटाचे शूटिंग २६ मार्चपासून सुरू झाले होते. चित्रपटाचे शूटिंग ऋषिकेश तसेच इतर अनेक ठिकाणी होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा - पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड सोमी अलीची सलमान खानला धमकी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.