रायपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्तीसगडमध्ये असणार आहेत. बीजापूर येथे झालेल्या चकमकीच्या ठिकाणाची ते पाहणी करतील. तसेच, जखमी जवानांनाही ते भेट देणार आहेत.
बीजापूर येथे शनिवारी सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २२ जवान हुतात्मा झाले होते. यासोबतच सुमारे ३१ जवान जखमी झाले होते, ज्यांमध्ये काही सीआरपीएफ जवानांचाही समावेश होता. या चकमकीत २५हून अधिक नक्षलवादीही ठार झाल्याची सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली.
ऑपरेशन फेल झाले असं म्हणता येणार नाही - सीआरपीएफ महासंचालक
"या संपूर्ण ऑपरेशनमध्ये गुप्तचर यंत्रणा वा जवान कुठेही कमी पडले नाहीत. गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती योग्य होती म्हणूनच हे ऑपरेशन इतक्या पुढे गेले. तसेच, आपले जवानही शिफातीने लढले, आपले जवान कमी पडले असते, तर एकही नक्षलवादी ठार झाला नसता." असे सिंह म्हणाले.
हेही वाचा : बीजापूर चकमक : हुतात्मा जवानांची संख्या २२ वर, राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या शोकसंवेदना