ETV Bharat / bharat

बंगालमध्ये भाजपा सत्तेत येणार? काय म्हणाले प्रशांत किशोर...

भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा पत्रकारांशी झालेल्या संवादाचा ऑडियो टि्वट केला आहे.

प्रशांत किशोर
प्रशांत किशोर
author img

By

Published : Apr 10, 2021, 3:09 PM IST

कोलकाता - भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा पत्रकारांशी झालेल्या संवादाचा ऑडियो टि्वट केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय होत असल्याचे प्रशांत किशोर यांनी स्वीकारल्याचे अमित मालविय यांनी म्हटलं. त्यांनी शेअर केलेल्या ऑडियोमध्ये प्रशांत किशोर भाजपाचे कौतूक करत असल्याचे ऐकायला मिळत आहे. तर यावर प्रशांत किशोर यांचीही प्रतिक्रिया आली आहे. भाजपाने अर्धाच ऑडियो शेअर केल्याचे ते म्हणाले. संपूर्ण ऑडियो शेअर केल्यास सत्य बाहेर येईल, असेही किशोर यांनी म्हटलं.

mit-malviya-claim-mamata-banerjee-strategist-prashant-praisedBJP is winning-
आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे टि्वट

काय म्हटलं प्रशांत किशोर यांनी -

टीएमसीच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपा जिंकत असल्याचे दिसत आहे. धुर्वीकरण होत असून लोक मोदींना मतदान करत आहेत. बंगालमध्ये 27 टक्के असलेला एससी आणि मतुआ समाज भाजपाला मतदान करत आहे. मोदी केवळ बंगालमध्येच नाही. तर संपूर्ण देशामध्ये लोकप्रिय आहेत, याबद्दल काही शंका नाही. देशभरातील लोक त्यांचे ऐकत आहेत. मतांचे ध्रुवीकरण देखील खरे आहे. अनुसूचित जातींचे मत भाजपाला जात आहे, असे पत्रकार कल्ब हाऊसच्या एका सार्वजनिक चॅटमध्ये प्रशांत किशोर यांनी म्हटल्याचे ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे.

प्रशांत किशोर यांची रणनीती बंगालमध्ये चालणार नाही. त्यांची रणनीती अपयशी ठरली आहे. टीएमसी बंगालमधून सत्तेतून जाणार हे नक्की आहे. बंगालमध्ये फक्त मोदींची रणनीतीच चालेल. मोदी सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात 'सोनार बंगाल' तयार केला जाईल, असे ऑडिओ लीक झाल्यानंतर भाजपा नेते राजीव बॅनर्जी म्हणाले.

प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया -

मला आनंद आहे की भाजपाचे लोक माझ्या वक्तव्यावर गंभीरपणे चर्चा करीत आहेत. मात्र, त्यांनी चर्चेचा काहीच भाग शेअर केला आहे. त्यांनी संभाषणाचा संपूर्ण ऑडियो शेअर करावा, ही माझी त्यांना विनंती आहे. भाजपा बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार नाही. बंगाल निवडणुकीत भाजपाला शंभरचा आकडा गाठता येणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी टि्वट करून म्हटलं.

हेही वाचा - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.