अमेरिकेतील प्रमुख शहरांमध्ये खाजगी आणि व्यावसायिक इमारतींवर निवडणूकीच्या निमित्ताने झळकत असलेले बॅनर्स आणि होर्डिंग्स पाहणे हे एक अभूतपूर्व असे दृश्य आहे. मात्र त्याचवेळी ही परिस्थिती मोठ्या हिंसाचाराची चाहूलदेखील दर्शवित आहे. अमेरिकेत भारतीय राजदूत राहिलेल्या मीरा शंकर यांच्या मते, दुसऱ्या टर्मसाठी आपण निवडून न आल्यास निवडणुकीचे निकाल नाकारण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना केलेल्या आवाहनामुळे जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीला डोनाल्ड ट्रम्प कारणीभूत आहेत. ज्येष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्याशी बोलताना, शंकर यांनी अमेरिकन समाजात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, एरव्ही देशाच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणावर राष्ट्रीय सहमतीने काम करणारी दोन्ही मुख्य पक्षातील समंजस आणि विचारी आवाज देखील आज टोकाची भूमिका घेत अत्यंत उजव्या किंवा डाव्या बाजूला झुकले आहेत. मीरा शंकर यांनी ईटीव्ही भारताला दिलेल्या खास मुलाखतीत ट्रम्प आणि बिडेन यांचे वेगवेगळे दृष्टिकोन, अमेरिकेत बहुपक्षीय पद्धतीला असलेली प्रतिकूलता, मतदानाच्या अंदाजाकडे कसे पाहावे आणि निकालाचे पारडे झुकविण्याची ताकद असलेले 'स्विंग स्टेट्स' याविषयी भाष्य केले. या मुलाखतीचा सारांश :
प्रश्न : जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या देशात निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर असलेली हिंसाचाराची भीती आणि तणाव याबद्दल आपल्याला काय वाटते?
उत्तर : मुळातच हे अतिशय अभूतपूर्व आहे. अमेरिकेसारख्या संस्थात्मक पातळीवर लोकशाहीची मूल्ये रुजलेल्या देशात अशाप्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते असा कोणी विचार देखील केला नसेल. परंतु अमेरिकेत सुरू झालेल्या अभूतपूर्व अध्यक्षपदाच्या कालखंडावरूनच याची सुरुवात झाली आहे. त्यातच डेमोक्रॅट पक्षाला मते मिळाल्यास ती फसव्या पद्धतीने असतील असे सांगत निकाल न स्वीकारण्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना केलेल्या आवाहनामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. मुळात निवडणुकीच्या शर्यतीतून मागे पडत असल्याचे पाहून प्रमुख राजकीय उमेदवाराने कायदा आणि निवडणुकांच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करणे अविश्वसनीय आहे. परिणामी त्यांचे समर्थक देखील या प्रकारचा उन्माद करत आहेत. कडव्या उजव्या विचारसरणीचे लोक आगीत आणखी तेल ओतत आहेत. या गोष्टी अचानक अवतरलेल्या नाहीत तर प्रमुख उमेदवाराने त्याला आपल्या निवडणूक रणनीतीचा एक महत्त्वपूर्ण भाग बनविला आहे.
प्रश्न : यापूर्वी देखील अनेक रंगतदार आणि चुरशीच्या निवडणूक झाल्या आहेत परंतु, २०२०ची निवडणूक अमेरिकेच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरेल असे वाटते का?
उत्तर : होय. या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे दोन भिन्न दृष्टीकोन आणि धोरणे पुढे ठेवली आहेत. मग ते आर्थिक धोरण असो की आरोग्याचा प्रश्न किंवा हवामान बदल आणि उर्जा धोरण असो की परराष्ट्र धोरण. अतिशय वेगवेगळे दृष्टिकोन असलेले दोन उमेदवार आहेत आणि प्रत्येकजण आपलेच धोरण कसे बरोबर आहे हे अमेरिकन नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील काही वर्षांत अमेरिका कसा ध्रुवीकृत झाला आहे हे त्याचे प्रतिबिंब आहे. देशाचे हित लक्षात घेऊन परराष्ट्र आणि आर्थिक धोरणावर सहमती घडवून आणण्यासाठी कार्यरत असणारा आणि एकमेकांना बरोबर घेऊन जाणारा सेंट्रिस्ट डेमोक्रॅट्स आणि सेंट्रिस्ट रिपब्लिकन यांचा एक मध्यममार्गी असा गट होता. परंतु, आता हा राष्ट्रीय हित लक्षात घेऊन काम करणारा मध्यवर्ती गट नाहीसा झाला आहे. आता भिन्न आणि परस्परविरोधी विचारसरणी असणारे दोन पक्ष दोन भिन्न दिशेने ओढत आहेत. एकीकडे रिपब्लिकन पक्ष, पार्टी चळवळीकडे झुकली आहे ज्याने एकप्रकारे कडवा उजवा मूलतत्त्ववाद जोपासला आहे. दुसरीकडे डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये डावी विचारसरणी मजबूत झाली आहे जो आणि डेमॉक्रॅटिक पार्टीमधून कॉंग्रेस आणि प्रतिनिधी सभागृहात दाखल झालेले बरेच तरुण डाव्या पक्षाचे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष गॉन वेगवेगळ्या दिशेने ओढले जात आहेत. उपराष्ट्रपती बिडेन यांची मध्यममार्गी (सेंट्रिस्ट) भूमिका आहे. आतापर्यंत ट्रम्प यांना बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नात डेमोक्रॅटिक पार्टी एकजूट आहे. अगदी डाव्या विचारसरणीच्या बर्नी सँडर्स यांच्या गटाने देखील बिडेन यांच्या उमेदवारीला मनापासून समर्थन दिले आहे. परंतु एकदा निवडणुका संपल्या आणि बिडेन यांनी विजय मिळविला, तर त्यांना डाव्या विचारसरणीच्या गटाला आणि आतापर्यंत ट्रम्प यांच्याविरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या मध्यममार्गी गटाला एकत्र घेऊन जात एखाद्या विषयावर एकमत घडवून आणत सत्ता राबविणे आव्हानात्मक असणार आहे. दुसरीकडे रेगन किंवा सीनियर आणि जॉर्ज बुश जूनियर यांच्याबरोबर काम केलेल्या पारंपारिक रिपब्लिकन संस्था आणि मतदार यावेळी उघडपणे ट्रम्पच्या विरोधात उतरले आहेत आणि अब्राहम लिंकनच्या नावाने लिंकन प्रोजेक्ट राबवित ते ट्रम्प यांच्याविरूद्ध जाहीरपणे घोषणा करत आहेत आणि या निवडणुकीत बिडेन यांना मतदान करण्याचे मतदारांना आवाहन करीत आहेत. तर, ट्रम्प यांचा स्वतःचा अतिशय कडवा उजवा असलेला मतदारसंघ मात्र ट्रम्प यांच्या खंबीरपणे पाठीमागे आहे. त्यामुळे सर्वात कठीण प्रसंगात देखील त्यांना ४२ टक्के मान्यता मिळाली आहे. ही मान्यता यावेळी बरीच स्थिर राहिली आहे. गोऱ्या अमेरिकनांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी ट्रम्प कायदा व सुव्यवस्थेचे हे कार्ड खेळत आहेत. दुसऱ्या वर्णाच्या लोकांचा विजय झाला तर गडबडीची भीती दाखवत आपल्यापासून दुरावलेल्यांना खेचण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. तर, आफ्रिकन किंवा लॅटिनो मतदारांसमोर आर्थिक मुद्दा घेऊन जात कोविडच्या काळात देखील आपल्या कार्यकाळात सर्वात कमी बेरोजगारी असल्याचे सांगत आहे.
प्रश्न - अमेरिकेत बहुपक्षीय पद्धती का विकसित झाली नाही?
उत्तर - मला असे वाटते की त्यांना दोन पक्षीय प्रणाली हाताळणे कठीण जात आहे. अध्यक्षपदासाठी उभे असलेले स्वतंत्र अपक्ष उमेदवार देखील त्यांच्याकडे आहेत. अल गोरेच्या काळात तुम्ही ते पाहिले आहे. मागील वेळी देखील हिलरीच्या विरोधात उभे असलेल्या अपक्ष उमेदवाराला स्थानिकांचा पाठिंबा होता. परंतु मुख्य प्रवाहातील अमेरिकन राजकारण या दोन पक्षांभोवतीच फिरत राहिले आहे आणि त्याला आव्हान देऊ शकेल असा प्रभावी तिसरा गट अस्तित्वात आलेला नाही. दोन्ही पक्षांमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेले गट आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये मत भिन्नता प्रतिबिंबित करते. जसे, प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये डावे आहेत त्याप्रमाणेच, टी पार्टी पूर्ण स्वतंत्र नाही. हा रिपब्लिकन पक्षाचाच एक भाग आहे.
प्रश्न - सलग दुसर्या निवडणूकीत बायडेन यांना मताधिक्य मिळत असून देखील मतदार आणि राजकीय पंडितांनादेखील आव्हान का निर्माण होत आहे?
उत्तर - बहुतेक अंदाजांमध्ये राष्ट्रीय पातळीवर बायडेन आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात किंवा गेल्या १५ दिवसांत घेण्यात आलेल्या सर्व पोलची सरासरी नोंदवणारे मतदान पाहिले तर ते राष्ट्रीय पातळीवर बायडेन यांना ७.८ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आघाडी मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष बहुसंख्य मतदारांनी दिलेले मत अध्यक्ष ठरवू शकत नाही तर बहुतेक राज्यांअंतर्गत लागणाऱ्या निकालावर आधारित ठरणाऱ्या 'इलेक्टोरल कॉलेज व्होट' अंतर्गत कोणाला मतदान होते हा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्या तुलनेत मागीलवेळी जवळजवळ ३० लाखांहून अधिक लोकप्रिय मते मिळून देखील गेल्या वेळी हिलरी पराभूत झाल्या होत्या. त्यांना 'इलेक्टोरल कॉलेज व्होट'मध्ये कमी मते मिळाल्याने पराभव पहावा लागला. पारंपारिकपणे डेमॉक्रॅट्सच्या मागे ठामपणे उभ्या असलेल्या आणि दृढ म्हणून मानल्या जाणार्या पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन ही 'स्विंग राज्ये' हिलरी यांनी गमावली. ट्रम्प यांनी अमेरिकन फर्स्ट, इकोनॉमिक प्रोटेक्शनिझम आणि अमेरिकेच्या गेलेल्या नोकऱ्या परत आणण्याच्या मुद्द्यावर पारंपारिक डेमॉक्रॅट्सच्या बाजूने असलेल्या पांढरपेशा कामगार वर्गाला आपल्या बाजूने वळविण्यात ट्रम्प यशस्वी झाले होते. अमेरिकेत असा एक मतदारसंघ आहे ज्याला आपण जागतिकीकरणात मागे पडल्याची भावना आहे. जागतिकीकरणाने त्यांचे काहीही भले झाले नाही असे त्यांना वाटते. अमेरिकेन कामगारांनी वेतनवाढ मागितल्यास कंपन्या कामगारांची मागणी धुडकावत स्पर्धात्मक वातावरण नसल्याचे सांगत आपले उद्योग देशाबाहेर घेऊन जात आहेत. परिणामी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जॉब आणि इतर बऱ्याच आयटी किंवा सॉफ्टवेअर नोकर्या भारतात हस्तांतरित झाल्या आहेत. त्यामुळे जागतिकीकरणाच्या दुष्परिणामाचा फटका बसलेला एक मोठा वर्ग ट्रम्प यांच्या बाजूला झुकला. मात्र स्वतःला कामगार वर्गाची पार्श्वभूमी असल्याने बायडेन यांची हिलरींच्या तुलनेत बाजू भक्कम आहे. म्हणूनच सध्या मिशिगन आणि विस्कॉन्सिन येथे त्यांना आघाडी मिळताना दिसत आहे. पेनसिल्वेनिया मध्ये आघाडी ५.५ टक्के इतकी खाली आहे. तर, फ्लोरिडा आणि जॉर्जियामध्ये बायडेनची यांना २ टक्क्यांची आघाडी आहे. त्यामुळे अतिशय 'काटे की टक्क' आणि निर्णायक भूमिका असलेल्या राज्यांवर ट्रम्प यांनी लक्ष केंद्रित केले आहे.