कोलकाता : अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि विश्वभारती विद्यापीठात जागेचा वाद सुरू असून हा वाद आता आणखी चिघळला आहे. अमर्त्य सेन यांनी विश्वभारती त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अमर्त्य सेन यांनी गुरुवारी सुरी न्यायालयात विश्वभारतीविरोधात खटला दाखल केला आहे.
विश्वभारतीने 6 मे रोजी घर खाली करण्यास बजावले : विश्वभारती विद्यापीठाने नोबेल पारोतोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली आहे. 6 मेच्या पूर्वी घर खाली करण्याचे या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. त्यामुळे अमर्त्य सेन यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. विश्वभारती विद्यापीठातील जागेवर अमर्त्य सेन यांचे प्रतिची हे घर आहे.
अमर्त्य सेन यांच्याकडे अतिरिक्त जमीन : नोबेल पारितोषिक विजेते तथा भारतरत्न अमर्त्य सेन यांचे विश्वभारती विद्यापीठातील शांतीनिकेतनमध्ये घर आहे. त्यांच्या प्रतिची या घराच्या जागेत 1.38 एकर जमीन असल्याचा विश्वभारतीचा आरोप आहे. त्यामुळे विश्वभारतीच्या अधिकाऱ्यांनी अमर्त्य सेन यांना वारंवार नोटीस बजावून जमीन परत करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर त्यांना जमीन बळकावणारा म्हणूनही अनेकदा हिणवले आहे. विश्वभारतीचे कुलगुरू विद्युत चक्रवर्ती यांनीही अनेकदा अमर्त्य सेन यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे.
विश्वभारतीने घरावर लावली नोटीस : विश्वभारती विद्यापीठाने अमर्त्य सेन यांच्या घरावर नोटीस लावली आहे. या नोटीसमध्ये जमीन 6 मे पर्यंत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर जमीन परत केली नाही, तर अधिकारी बळाचा वापर करुन जमीन रिकामी करुन घेतील असेही नमूद करण्यात आले आहे. अमर्त्य सेन यांनी जमीन परत केली नसल्यास वेळप्रसंगी सक्ती करण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.
अमर्त्य सेन यांच्याविरोधात विद्यार्थिनीची तक्रार : अमर्त्य सेन आणि विश्वभारती यांच्यात जागेच्या वादात आता नवीन ट्विस्ट पुढे आला आहे. अमर्त्य सेन यांनी कुलगुरू विद्युत चक्रवर्ती यांच्यासह कुलसचिव आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांना देशद्रोही संबोधल्याचा आरोप विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने केला आहे. त्रिशा राणी भट्टाचार्य असे त्या अमर्त्य सेन यांच्यावर आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असून तिने शांतीनिकेतन पोलीस ठाण्यात अमर्त्य सेन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
15 मे रोजी होणार सुनावणी : अमर्त्य सेन यांनी गुरुवारी सूरी जिल्हा न्यायालयात विश्वभारती विद्यापीठाच्या विरोधात खटला दाखल केला आहे. अमर्त्य सेन यांच्या तीने वकील सौमेन मुखर्जी आणि गोराचंद चक्रवर्ती यांनी खटला दाखल केला. खटल्याच्या सुनावणीसाठी 15 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. अमर्त्य सेन यांचे वकील गोराचंद चक्रवर्ती यांनी सुरी न्यायालयात अपील दाखल केले आहे. न्यायाधीशांनी 15 मे ही सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.
हेही वाचा - HD Deve Gowda: आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात अनेक बदल होऊ शकतात -एचडी देवेगौडा