ETV Bharat / bharat

Amalaki Ekadashi २०२३ : असे करा आमलकी एकादशीचे व्रत, आवळ्याच्या खास पूजेने भगवान विष्णू होतील प्रसन्न - भगवान विष्णूला आवळ्याने पूजा

होळीच्या अगोदर येणाऱ्या आमलकी एकादशीचे महत्व खूप मोठे असल्याची माहिती ज्योतिष्यशी देतात. या दिवशी भगवान विष्णूला आवळ्याने पूजा केली जाते. जाणून घ्या आमलकी एकादशीचा पूजाविधी आणि व्रताविषयीची सविस्तर माहिती.

Amalaki Ekadashi २०२३
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 28, 2023, 1:47 PM IST

Updated : Mar 3, 2023, 7:39 AM IST

नवी दिल्ली : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे संबोधले जाते. या एकादशीला भगवान विष्णूची आवळ्याने पूजा केली जाते. आमलकी एकदशी यावर्षी ३ मार्चला येत आहे. यावर्षी आमलकी एकादशीला तीन योग जुळून आले आहेत. त्यामुळे या एकादशीचे महत्व वाढले आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या पद्धतीने पूजा करावी याबाबतची माहिती.

कधी आहे आमलकी एकादशीचा योग : आमलकी एकदशीला 2 मार्च रोजी सकाळी 6.39 वाजता तिथी सुरू होत आहे. ती तिथी 3 मार्च रोजी सकाळी 9.11 वाजता संपून द्वादशी तिथी सुरू होईल. उदय तिथीमुळे अमलकी एकादशी 3 मार्च रोजी साजरी होणार आहे. एकादशीचे व्रत ३ मार्चच्या रात्री किंवा ४ मार्चला करता येत असल्याची माहिती ज्योतिषाचार्य पंडित शिवकुमार शर्मा यांनी दिली आहे. यावर्षी आमलकी एकादशीला तीन योग जुळून येत आहेत. यात सौभाग्य योग, शोभन योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा समावेश आहे.

आमलकी एकादशीची काय आहे अख्यायिका : आमलकी एकादशीला महादेव आणि पार्वती काशीला आल्याची अख्यायिका आहे. महादेव पार्वती काशीला आल्यानंतर त्यांच्यासोबत भक्तांनी फुलांची होळी खेळल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे होळीच्या अगोदर येणाऱ्या आमलकी एकादशीचे महत्व आणखी वाढले आहे. तर दुसरीकडे ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या नाभीतून अवतरले. यावेळी त्यांनी स्वत:ला जाणून घेण्यासाठी परब्रम्हाची तपस्या केली. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन प्रकटले. यावेळी भगवान विष्णूनी दर्शन दिल्यामुळे बह्माच्या डोळ्यातून अश्रू निघून ते भगवान विष्णूच्या पायावर पडताना त्याचे आवळ्यात रुपांतर झाले. त्यामुळे भगवान विष्णूंनी मला आवळ्याचे फळ प्रिय असल्याचे सांगितले. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी आवळ्याची पूजा केल्याची अख्यायिका सांगितली जाते.

आमलकी एकादशीचे व्रत : हिंदू धर्मशास्त्रानुसार द्वादश विधीला एकादशीचे व्रत करणे उत्तम आहे. त्यामुळे आमलकी एकादशीचे व्रत 3 मार्चला पाळसे जाईल अशी माहिती ज्योतिषाचार्य पंडित शिवकुमार शर्मा यांनी दिली. एकादशी वाढली आहे, म्हणजे पहिल्या दिवशी 24 तास एकादशी असते. तर दुसर्‍या दिवशी तीन मुहूर्तांपर्यंत ती वाढते. त्यामुळे एकादशीचा कालावधी वाढल्याचे दिसून येते. दुसऱ्या एकादशीचे व्रत शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांसाठी शुभ असल्याचेही ज्योतिषाचार्य पंडित शिवकुमार शर्मा यांनी सांगितले.

का करण्यात येते आवळ्याची पूजा : आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यात येते. आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूचा वास असल्याचे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या लाडक्या आवळ्याची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पूजाविधी केल्यानंतर आवळा वृक्षाची प्रदक्षिणा करण्याचाही विधी करण्यात येतो. आपल्या जवळ आवळ्याचे झाड नसेल तर विष्णूला प्रसाद म्हणून आवळा अर्पण करत तुपाचा दिवा लावल्यानेही भगवान विष्णू प्रसन्न होतात. आमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नका. आपले आचरण सदाचारी ठेवा, नियमांचे पालन करा आणि संयमाने वागा. भगवान विष्णूच्या मंत्राचा जप किंवा विष्णु सहस्त्रनाम पाठ केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, असेही ज्योतिषाचार्य पंडित शिवकुमार शर्मा यांनी यावेळी सांगितले.

आमलकी एकादशीचे महत्त्व : हिंदू पंचांगानुसार आमलकी एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची इच्छा पूर्ण होते. त्यामुळे मोक्ष प्राप्तीची इच्छा असलेल्यांनी आमलकी एकादशीचे व्रत करण्याचे ज्योतिषाचार्य सूचवतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने सुख-समृद्धी वाढून सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळत असल्याची अख्यायिका आहे.

Disclaimer : या लेखात दिलेली माहिती ही ज्योतिष्यशास्त्रात दिलेल्या माहितीवर आधारित आहे. या लेखात दिलेल्या तथ्याची ईटीव्ही भारत पुष्टी करत नाही. ईटीव्ही भारत कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी देत नाही.

हेही वाचा - Rahu Shukra Yuti 2023 : राहू शुक्राची होणार 12 मार्चपासून युती: जाणून घ्या तुमच्या राशीवर शुक्राची कसी पडेल वक्रदृष्टी

Last Updated : Mar 3, 2023, 7:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.