ETV Bharat / bharat

एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना घेता येणार कोरोना लस; प्रकाश जावडेकरांची माहिती

author img

By

Published : Mar 23, 2021, 3:21 PM IST

Updated : Mar 23, 2021, 3:58 PM IST

All above 45 years to get vaccine jab from April 1st: Govt
एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना घेता येणार कोरोना लस; प्रकाश जावडेकरांची माहिती

15:19 March 23

नवी दिल्ली : एक एप्रिलपासून आता ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लस घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. ते केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती देत होते.

जावडेकर म्हणाले, की आतापर्यंत देशात एकूण ४ कोटी ८५ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यांपैकी ८० लाख लोकांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार लोकांचे लसीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून, आपल्याकडे लसींची कमतरता नसल्याचेही जावडेकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा : शरद पवारांचा अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा डाव फसला - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Mar 23, 2021, 3:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.