मुंबई Financial Fraud With Company : आरोपी अमित वाकडे याने दादर येथील शिवा इंटरप्राईजेस या कंपनीचे पार्टनर राजन जाधव यांना बाजार दरापेक्षा प्रति किलो दोन रुपये 46 पैशांनी कमी किमतीने साखर खरेदी करून देतो अशी बतावणी केली. यानंतर त्यांच्याकडून 1 कोटी 77 लाख 38 हजार 95 रुपये स्वीकारून त्यापैकी 54 लाख 35 हजार 95 रुपये किमतीचा साखरेचा माल किंवा रक्कम शिवा इंटरप्राईजेस कंपनीला दिली नाही. तसेच उर्वरित रक्कम परत करण्याच्या बाबतीत कागदपत्रे तयार करून ते व्हाट्सअपवर पाठवून वायदे करून कंपनीचा विश्वासघात केला. म्हणून या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात आरोपी अमित वाकडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 406, 420 आणि 499 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक झालेली नसून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
तर कंपनीवर ब्लॅकलिस्ट होण्याची शक्यता : शिवा इंटरप्राईजेस या कंपनीत गेल्या आठ वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या अनमोल गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. हा पैशांचा व्यवहार 15 जून ते 18 जून या दरम्यान झाला होता. शिवा इंटरप्राईजेस ही कंपनी साखर डिलिव्हरी करण्याचे काम करते. कंपनीचे साखर साठवण्याचे गोडाऊन पुणे महाळुंगे, नाशिक, सिन्नर या ठिकाणी आहेत. येथून साखरेचा माल व्यापाऱ्यांना पुरवला जातो. या कंपनीचे कार्यालय दादर पश्चिम येथे गोखले रोडवर आहे. या कंपनीचे राजन जाधव आणि आर्यमान जाधव असे दोन पार्टनर आहेत. शिवा इंटरप्राईजेसचे व्यवस्थापक अनमोल गुप्ता यांनी दिलेल्या जबाबानुसार, या व्यवसायात साखरेचा माल ज्यांच्याकडून विकत घ्यायचा आहे अशांना ऍडव्हान्स पेमेंट करावा लागतो. सर्वसाधारणपणे पुण्यातील घोडगंगा येथील साखर कारखान्यातून साखरेचा माल खरेदी करतो. पुण्यातील घोडगंगा या साखर कारखान्यात 15 जून ते 20 जून दरम्यान साखरेचा साठा उपलब्ध नव्हता. त्यामुळे शिवा इंटरप्राईजेसने सरकारी व्हेन्डर्सना साखरेचा माल पुरवण्याचे काम करत असल्यानं साखरेचा माल वेळेत सप्लाय करावा लागतो. असं झालं नाही तर कंपनीचे नाव ब्लॅकलिस्टेड होण्याची शक्यता असते.
साखरेचे टेंडर खरेदी करण्याची माहिती : शिवा इंटरप्राईजेस या कंपनीचे पार्टनर राजन जाधव यांच्या ओळखीचे निलेश पाटील यांनी पुणे येथील साखरेचे व्यापारी नर्मदेय ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे अमित वाकडे हे कारखान्यातून साखरेचे टेंडर खरेदी करत असल्याची माहिती दिली. राजन जाधव यांनी अमित वाकडे यांच्या मोबाईल क्रमांकावर 15 जून 2023 रोजी फोन करून साखरेचा स्टॉक आणि दर याविषयी चौकशी केली असता आम्ही त्याने राजन यांना जीएसटी आणि ट्रान्सपोर्ट सह साखरेचे प्रति किलो 35.50 दर सांगितला. राजन जाधव यांनी अमित याला पंधराशे टन साखर खरेदी करायचे असल्याचे सांगितले असता आम्ही त्याने राजन यांना पर्चेस ऑर्डर व्हाट्सअप करायला सांगितले. म्हणून व्यवस्थापक असलेल्या गुप्ता यांनी 15 जून 2023 रोजी पर्चेस ऑर्डर तयार केली. परचेस ऑर्डरच्या अनुषंगाने अमित वाकडे 18 जून 2023 रोजी दुपारी बारा वाजता कंपनीच्या दादर येथील ऑफिसच्या ठिकाणी आला होता. राजन जाधव आणि अमित वाकडे यांनी 15 जून 2023 रोजीची पर्चेस ऑर्डर समोरासमोर बसून कन्फर्म केली.
ऑफिसला भेट दिला आणि भलतचं कळलं : परचेस ऑर्डरची एक कॉपी अमित वाकडे याला दिली आणि 19 जून 2023 रोजी सायंकाळी सहा वाजून 22 मिनिटांनी अमित वाकडे याच्या मोबाईल नंबरवर पर्चेस ऑर्डर व्हाट्सअप केली असता त्याने ओके असा रिप्लाय दिला. पर्चेस ऑर्डर मिळाल्यानंतर 500 मॅट्रिक टन साखरेचे पैसे शिवा कंपनीच्या बँक खात्यातून ओवरड्राफ मार्फत नर्मदेय ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यात आरटीजीएस पद्धतीने ट्रान्सफर केले. एकूण 1 कोटी 77 लाख 38 हजार 95 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. अमित वाकडे याने 25 जून ते 26 जून 2023 रोजी पर्यंत 75 टन साखर दिली. उर्वरित साखर तो देत नव्हता म्हणून गुप्ता याने त्याच्याकडे तगादा लावला असता त्याने 10 जुलै 2023 रोजी 20 लाख 87 हजार पाचशे रुपये परत केले. नंतर अमित वाकडे हा व्यवस्थापक गुप्ता याचा फोन कॉल रिसीव करत नव्हता. म्हणून 18 जुलै 2023 रोजी त्याच्या बेलापूर येथील ऑफिसला भेट दिली असता त्या ऑफिसला तो येत नसल्याचे समजले. त्यानंतर 2 ऑगस्ट 2023 रोजी गुप्ता याने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक साठे यांनी प्राथमिक चौकशी केली असता अमित वाकडे हा सांगली येथील कारखान्याचे व्यापारी विक्रम पाटील यांच्याकडून साखर खरेदी करत असल्याचे समजून आले. म्हणून साठे यांनी 6 ऑगस्ट 2023 रोजी पाटील यांना पत्र लिहून त्यांच्याकडून देणे असलेली साखर शिवा इंटरप्राईजेस यांना देण्यास सांगितले. यानंतर पाटील यांच्याकडून कंपनीला 8 ऑगस्ट 2023 ते 23 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत एकूण 190 टन साखर मिळाली.
वाकडेवर विश्वासघात करण्याचा आरोप : यानंतर 25 ऑगस्ट 2023 रोजी अमित वाकडे याने कंपनीच्या बँक खात्यात 8 लाख 8 हजार रुपये ट्रान्सफर केले आणि उर्वरित 54 लाख रुपये 2 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत दोन इंस्टॉलमेंटमध्ये देणार असल्याचं आश्वासन दिलं. दरम्यान 15 जून 2023 रोजी साखरेचे प्रति किलो दर 37.96 रुपया असल्याची बतावणी करून अमित वाकडे यांनी 15 जून 2023 रोजी 35.50 दराने साखर देणार असल्याचं राजन जाधव यांना सांगितले होते. प्रत्यक्ष बाजार दरापेक्षा अमित वाकडे यांनी सांगितलेल्या साखरेचे दर कमी होते. म्हणून राजन जाधव हे आमिषाला बळी पडले आणि अमित वाकडे याला 1 कोटी 77 लाख 38 हजार 95 रुपये साखरेचा व्यापारी म्हणून दिले. नंतर 54 लाख 35 हजार 95 रुपये किमतीचा साखरेचा माल न देता शिवा इंटरप्राईजेस कंपनीचा विश्वासघात करून फसवणूक केली. म्हणून अमित वाकडे याचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :