नवी दिल्ली - अल कायदाचा प्रमुख अयमान अल - जवाहिरी याला ड्रोन हल्ल्यात ठार ( Al Qaeda leader Ayman al Zawahiri death claim ) केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहिरीला सीआयएच्या ड्रोनने ( Zawahiri killed in cia drone strike claim america ) अफगाणिस्तानात ठार केले. अल-कायदाचा प्रमुख नेता अयमान अल - जवाहिरी हा अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याचेही अनेक मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. उदारमतवादी इजिप्तमध्ये जन्मलेल्या जवाहिरीचा सर्जन ते दहशतवादी असा प्रवास जाणून घ्या.
हेही वाचा - अमेरिका का दावा: अल कायदा सरगना अयमान अल जवाहिरी मारा गया
- अल जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 रोजी एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी तो मुस्लिम ब्रदरहूडचा सदस्य झाला. त्याला अरबी आणि फ्रेंच बोलता येत असे. त्याने वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले होते आणि व्यवसायाने सर्जन होता.
- 1978 मध्ये अल जवाहिरीच्या लग्नाची कैरोमध्ये बरीच चर्चा झाली. त्याने कैरो विद्यापीठातील दर्शनशास्त्राची विद्यार्थिनी अजा नोवारीशी लग्न केले. इजिप्त तेव्हा उदारमतवादी होता. पण अल जवाहिरीच्या लग्नात स्त्री आणि पुरुष वेगळे बसले होते. छायाचित्रकार आणि संगीतकारांवर तर बंदी होतीच, पण विनोद करण्यावरही बंदी होती.
- जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) स्थापन केला. ही 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध करणारी एक उग्रवादी संघटना होती. इजिप्तमध्ये इस्लामिक राजवट प्रस्थापित करणे हे त्यांचे ध्येय होते.
- 1981 मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अनवर सादात यांच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेल्या आणि छळ करण्यात आलेल्या शेकडो लोकांमध्ये जवाहिरीचा समावेश होता. तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर तो देश सोडून सौदी अरेबियात आला.
- सौदी अरेबियात आल्यानंतर त्याने औषधी विभागात प्रॅक्टिस सुरू केली. येथेच त्याची अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनशी भेट झाली.
- 1985 मध्ये बिन लादेन पेशावर, पाकिस्तानमध्ये अल कायदाला प्रोत्साहन देण्यासाठी गेला होता. यावेळी अल जवाहिरीही पेशावरमध्ये होता. येथून या दोन दहशतवाद्यांचे नाते घट्ट होऊ लागले.
- यानंतर 2001 मध्ये अल - जवाहिरीने ईआयजेचे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले. यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी मिळून जगाला हादरवण्याचा कट रचला.
- 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर 2001 च्या शेवटी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार पाडले तेव्हा बिन लादेन आणि जवाहिरी दोघेही पळून गेले होते. नंतर बिन लादेनला अमेरिकन सैन्याने 2011 मध्ये पाकिस्तानात ठार केले.
- अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेची कमान हाती घेतली. 2011 मध्ये तो अल-कायदाचा प्रमुख बनला.
- अल-जवाहिरीने या वर्षी एप्रिल महिन्यात 9 मिनिटांचा एक व्हिडिओ रिलीज केला होता. व्हिडिओमध्ये जवाहिरीने फ्रान्स, इजिप्त आणि हॉलंड हे देश इस्लामविरोधी देश असल्याचे सांगितले होते. जवाहिरीने भारतातील हिजाबाच्या वादावरही बेताल वक्तव्य केले होते.
हेही वाचा - सर्जन से लेकर दुनिया को दहलाने तक ऐसा रहा जवाहिरी का खौफनाक जीवन