ETV Bharat / bharat

SIT SAYS PATEL BEHIND DEFAMING GUJARAT : गुजरातच्या बदनामीमागे दिवगंत काँग्रेस नेते अहमद पटेल यांचा हात - एसआयटी

गुजरात दंगल प्रकरणी विशेष तपास पथकाने ( SIT ) महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तपास पथकाने गुजरातच्या बदनामीमागे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल ( Ahmed Patel ) यांचा हात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संदीप पात्रा यांनी म्हटले आहे की, या षडयंत्रामागे कोण आहे हे एसआयटीच्या प्रतिज्ञापत्राने आता स्पष्ट झाले आहे. अहमद पटेल हे केवळ समोर आलेले नाव आहे, सूत्रधार सोनिया गांधी आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

AHMED PATELS
AHMED PATELS
author img

By

Published : Jul 16, 2022, 9:16 AM IST

Updated : Jul 16, 2022, 11:55 AM IST

अहमदाबाद : गुजरात दंगलीप्रकरणी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ( SIT ) धक्कादायक खुलासा केला आहे. सुनियोजित पद्धतीने गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपास पथकाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामागे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल ( Ahmed Patel ) यांचा हात होता. त्याच्या सांगण्यावरून संपूर्ण कट रचला गेला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, भाजपने म्हटले आहे की, गुजरात दंगलीच्या मागे कोणाचे षडयंत्र होते हे एसआयटीने दाखल केलेल्या शपथपत्राने सर्वांसमोर आले आहे.

गुजरात पोलिसांनी शुक्रवारी कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाडच्या जामीन अर्जाला विरोध केला आणि म्हटले की त्या राज्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार पाडण्याच्या मोठ्या कटात सहभागी होत्या. गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सत्र न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा करण्यात आला आहे की, 2002 च्या दंगलीनंतर राज्यातील भाजप सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून सेटलवाड यांनी मोठा कट रचला होता.

नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी - एसआयटीने दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्राने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एसआयटीने प्रतिज्ञापत्रात खुलासा केला आहे की, नरेंद्र मोदींना फसवण्यासाठी अहमद पटेल यांच्याकडून तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार, संजीव भट्ट यांना निधी मिळाला होता. या सर्व प्रकरणात एसआयटीकडे ठोस पुरावेही आहेत.

सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब - अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीडी ठक्कर यांनी विशेष तपास पथकाचा (एसआयटी) जबाब नोंदवून घेत जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. गुजरात दंगल प्रकरणांमध्ये निरपराध लोकांना अडकवण्यासाठी पुरावे तयार केल्याच्या आरोपावरून सेटलवाड यांना माजी आयपीएस अधिकारी आर.के. बी. श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांच्यासह अटक करण्यात आली आहे.

गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, जामीन अर्जदार सेटलवाड यांचा हा कट रचण्याचा राजकीय हेतू होता. जनतेने निवडून दिलेले सरकार पाडण्याचा किंवा अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या शपथपत्रात आरोप केला आहे की, निरपराध लोकांना फसवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या बदल्यात सेटलवाड यांना भाजपच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाकडून बेकायदेशीर आर्थिक आणि इतर फायदे आणि बक्षिसे मिळाली.

षडयंत्र कोणाचे ते स्पष्ट झाले - दरम्यान, भाजपचे नेते संदीप पात्रा यांनी म्हटले आहे की, एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राने या षडयंत्रामागे काँग्रेसच असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमद पटेल हे केवळ समोर आलेले नाव आहे. त्यांच्या नावाने सुत्रे हलविणाऱ्या त्यांच्या नेत्या सोनिया गांधी आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा - Explanation by Uday Samant : 'जे झालं ते जोडण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हता...', उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

Last Updated : Jul 16, 2022, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.